💥वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती ग्राम स्वच्छतेचा संदेश अभियानाने साजरी....!


💥संत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध ठीकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले💥


फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर शहरात संत गाडगेबाबा शोध बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीर यांच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त विविध ठीकाणी  स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

                 सर्व प्रथम संत गाडगेबाबा विद्यापीठ मंगरुळपीर व महात्मा फुले उद्यान मंगरूळपीर व गाडगेबाबा मंदिराजवळचे परिसर स्वच्छ करून व संत गाडगेबाबा मंदीर कारंजा रोड येथे जयंती साजरी केली.व त्यानंतर नगरपरिषद मध्ये पुष्पहार पुजन केले. 


अशाप्रकारे संत गाडगेबाबा यांची जयंती उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते साजरी करण्यात आली.संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक व सदस्य अतुल  उमाळे, गोपाल गिरी गोपाल, जयस्वाल सुमित मुंधरे, सोनू सुळके,अपूर्व चेके, निरंजन सोनूने,कवी भोयर,सुदर्शन काकड, अजय आडे,सुनील श्रृंगारे,संतोष मंडवगडे, गोपाल राऊत,दत्ता मानेकर यांनी परीश्रम घेतले अशी माहिती. पथकाचे स्वयंसेवक अतुल उमाळे यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या