💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ॲक्शन मोडवर....!


💥परभणी ते साडेगाव पुलाची झाली साफसफाई,दोन दिवसात होणार पुलाची गुणवत्ता तपासणी💥


परभणी - परभणी ते साडेगाव रोडवरील मांगणगाव जवळील निम्न दुधना प्रकल्पावरील दुहेरी पुलाचे काम अर्धवट सोडून गुत्तेदार पळून गेला होता हा पुल मागील १२-१३ वर्षापासून तसाच अर्धवट असुन पुल बांधल्यापासून त्या पुलाचा वाहतुकीसाठी एकदाही उपयोग झाला नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष परभणी व साडेगाव, मांगणगाव, सावंगी खुर्द, बोबडे टाकळी, जोड परळी व पिंगळी कोथाळा येथील गावकऱ्यांच्या वतीने दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी या पुलाला मृत घोषित करून संबंधीत पुलाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराचे पिंडदान व गोडजेवण कार्यक्रम या पडिक पुलावर घेण्यात आला होता. या पिंडदान व गोड जेवण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री डी जी पोत्रे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. ए. एम. विघ्ने विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निमंत्रीत करण्यात आले होते.


मागील १२-१३ वर्षांपासून कुंभकर्णाच्या झोपेत असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग प्रहार जनशक्ती पक्षाच्या या अनोख्या आंदोलनामुळे खडबडून जागा होऊन तात्काळ ऍक्शन मोडवर आला व आंदोलन संपल्यावर लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता श्री. ए. एम. विघ्ने यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे व आंदोलनकर्त्या गावकऱ्यांसह पुलाची तात्काळ पाहणी केली व दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी या पुलावरील १०-१५ फुटांपर्यंत वाढलेले जंगल साफ करून घेतले.

दि.२५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत संबंधीत पुलाच्या दर्जा तपासणीसाठी गुणवत्ता तपासणी तज्ज्ञांकडून पुलाची तपासणी करून घेतली जाईल व जर पुल वाहतुकीसाठी योग्य असेल तर तात्काळ पुलावरून वाहतुक सुरु केली जाईल अन्यधा संबंधीत पुल पाडण्यात येईल व नाबाई २८ योजनेच्या आगामी नियोजनामध्ये संबंधील पुलाला मान्यता घेऊन नविन पुल बांधला जाईल. तसेच पुल पाडल्यास पर्यायी पुल रस्ता तयार करून दिला जाईल. असे लेखी अश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाच्या वेळी प्रहार जनशक्ती पक्षास दिले होते..

प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग जागे झाले असून मांगणगाव, साडेगाव, सावंगी खुर्द, बोबडे टाकळी, जोडपरळी व पिंगळी काथाळा येथील गावकऱ्यांना पावसाळयामध्ये या रस्त्यावरून वाहतुक करता येईल.

पिंडदान व गोडजेवण आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, मांगणगावचे सरपंच राजेभाऊ वरकड, रामप्रसाद महाराज शिंदे मांगणगावकर, उपसरपंच लक्ष्मण मुळे, साडेगावचे सरपंच शेषेराव भांगे, तालुका प्रमुख बालासाहेब तरवटे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंजारे, वाहतुक आघाडी तालुकाप्रमुख रामेश्वर जाधव, मीडिया प्रभारी नकुल होगे, पंढरी शिंदे, अशोकराव वरकड, आनंतराव शिंदे, भास्कर शिंदे, सय्यद मुस्तफा, शेख बशीर, विनोद वरकड, गुलाब शिंदे, राम शिंदे, गणेश भुमरे, दत्तराव रौंदळे, शिवाजी पंढरकर, प्रशांत भुमरे, गणेश भुमरे, गणपत रौंदळे, प्रल्हादराव माळेकर, अशोक मुळे, पद्माकर वायवळ, रामप्रसाद वरकड , किरण चोपडे, नितीन चोपडे, गोपिनाथ चोपडे यांच्यासह परिसरातील गावकरी मंडळी मोठया प्रमाणावर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या