💥पुर्णा तालुक्यातील चुडावा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी...!


💥सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन💥 


पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या निमित्ताने तालुक्यातील चुडावा येथे दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड येथील आधार हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व समस्त गावकरी मंडळींना शिव जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 


यावेळी डॉ. संजय कदम यांचा चुडावा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच यावेळी चुडावा गावचे चेअरमन दासराव देसाई यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.यावेळी उत्तमराव ढोणे मामा, गीताराम काका देसाई, सुभाषराव देसाई, माजी सभापती व्यंकटराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ आप्पा सोळंके, सोनखेडचे सरपंच चंद्रकांत सुर्यवंशी, गणेशराव देसाई पाटील, पापाराव देसाई, शहाजीराव देसाई, अशोकराव देसाई, हरी पाटील सुर्यवंशी, महादजी देसाई, दत्तराव देसाई, साई चौधरी, युवा नेते स्वप्नीलभाऊ देसाई, बालाजी देसाई, सुधाकर देसाई, कल्याण देसाई, विलास देसाई, वैभव देसाई आदींसह समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती...

#शिवजन्मोत्सव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या