💥जिंतूर तालुक्यातील तलाठी व मंडळ निरीक्षक यांनी मुख्यालयात हजर राहावे....!


💥अशी मागणी रिपब्लिकन सेना शाखेच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली💥

जिंतूर / बी. डी. रामपूरकर

 जिंतुर तालुक्यातील तलाठी श्री. अनिल राठोड सावळी (बु), श्री.होळ (डिग्रस), श्रीमती गायकवाड मॅडम (चादज), श्री.वाकेकर यांनाव मंडळ अधिकारी श्रीमती आतकरे  मॅडम चारठाणा यांना सज्जावर व मंडळामध्ये हजर राहण्याचे आदेशीत करा.

    जिंतूर तालुक्यातीलआपणास रिपब्लिकन सेना शाखा जिंतुर च्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे की, जिंतुर तालुक्यातील वरील तलाठी व मंडळ अधिकारी हे त्यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे शेतकरी, भुमीहीन शेतमजुर यांना सातबारा, ७/१२ व इतर जे कागदपञे तलाठी यांच्याकडून घेण्यासाठी जिंतूर येथे यावे लागतात. वरील नमूद तलाठी मंडळ अधिकारी यांनी जिंतुर येथे आपल्या सोयीनुसार तलाठी कार्यालय थाटलेले असल्यामुळे शेतकरी व भुमीहीन शेतमजुर यांना कामे बंद ठेवून जिंतुर यावे लागत आहे. आपणास विनंती की, ज्या ज्या गावातील तलाठी सज्जा व मंडळ दिला आहे त्याठिकाणी तलाठी मंडळ अधिकारी यांना नियुक्त केलेल्या सज्जावर हजर राहण्याचे आदेशीत करावे असे रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष शरद चब्हाण यांनी म्हटले आहे.....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या