💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाचे अपडेट/ हेडलाईन्स / बातम्या...!


💥लातूरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात तलवार अन् कोयते दाखवत नाच व्हिडीओ व्हायरल होताच नवरदेवासह मित्र फरार💥 

✍️ मोहन चौकेकर

1. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना 

2. महाराष्ट्रात निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, मार्चमध्ये निर्बंध शिथिल होण्याची शक्यता , आरोग्य विभागाच्या परीक्षा नव्या पद्धतीने होणार, आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती 

3. काही जणांकडून फक्त भगवा मिरवण्याचं काम, महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपवर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

 4. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या 'अधीश'वर कारवाई होणार ? मुंबईत जुहूमधल्या बंगल्याची महापालिकेच्या पथकाकडून पाहणी  , नारायण राणेंच्या सिंधुदुर्गमधील आणखी एका बंगल्यावर कारवाई होणार?

5. गेल्या 24 तासात देशात 16 हजार 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 206 जणांचा मृत्यू , तिसरी लाट ओसरली, रविवारी राज्यात 1437 कोरोना रुग्णांची नोंद, सहा मृत्यू 

6. बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरण: माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाचव्या गुन्ह्यात पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड 

7. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी राज्याचं पुन्हा केंद्राला साकडं  , मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल; केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या भेटीनंतर सुभाष देसाईंची अपेक्षा 

8. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, यंदा देशात मान्सून सरासरी राहणार, स्कायमेटचा अंदाज 

9. लातूरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात तलवार अन् कोयते दाखवत नाच! व्हिडीओ व्हायरल होताच नवरदेवासह मित्र फरार 

10. टीम इंडियाने रचला इतिहास! T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी            

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या