💥पुर्णा शहरा बाहेरील समाधान बार अँड रेस्टॉरंट मधील असमाधानकारक संभाषण शेवटी बदलले तुंबळ हाणामारीत..!


💥शहरात निवडणूकपूर्व 'राजकीय दडपशाहीच्या' रंगीत तालिमीला सुरूवात ; दहशत माजवणाऱ्यांची आपसात तडजोड💥 

💥राजकीय दहशतवादाचा शहरातील जनसामान्यांसह व्यापाऱ्यांना झटका ; निरपराधांना मात्र दंडूक्याचा फटका💥

पुर्णा (दि.२१ फेब्रुवारी) - 'पुर्णा शहर तसे चांगले परंतु दडपशहांनी अक्षरशः वेशीला टांगले' भ्रष्ट राजकीय भस्मासुरांसाठी नगर परिषद म्हणजे शासकीय विकासनिधी कागदोपत्री विकासकाम दाखवून कोट्ट्यावधी रुपयांचा निधी गिळकृत करण्याचा जुगारअड्डा वाटला की काय ? असा गंभीर प्रश्न निर्माण होत असून कोणत्याही परिस्थितीत 'साम-दाम-दंड-भेद' या  चार तत्वांचा अवलंब करून निवडणूक जिंकून विनाविलंभ धनदांडग कस होता येईल या एकमेव उद्देशाने पछाडलेल्या राजकीय दडपशहांनी हळुवारपणे आपआपसातील राजकीयवादाला सार्वजनिक स्वरूप देऊन शहरातील सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे राजकीय दहशतवाद माजवण्यास सुरूवात केल्याचे निदर्शनास येत असून असाच गंभीर प्रकार काल रविवार दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी शहरात घडला शहराबाहेरील पुर्णा-झिरोफाटा मार्गावरील समाधान बार अँड रेस्टॉरंट या बियरबार मधील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस नगर सेविकेच्या दिरातील असमाधाकारक संभाषणाचे रुपांतर शेवटी पहाता पहाता दोन्ही गटातील तुंबळ हाणामारीत झाल्याने याचे पडसाद पाहता पाहता शहरातही पडायला सुरुवात झाली अन् राजकीय दडपशाहीचा फटका व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना ही बसला.


या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की शहरातील मस्तानपुरा भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २०१६ साली झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आले माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हाजी कुरेशी यांनी या प्रभागातील माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेचे पति चाँदसाहब बागवान यांनी एकाच पॕनल मधून निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता एकत्रितपणे निवडणूक लढवून सुध्दा दोघांमध्ये बेबनाव झाल्यामुळे कालांतराने आपसात वर्चस्वाची लढाई लढण्यास दोघांनीही सुरूवात केली नगर परिषदेचा कालावधी संपल्यामुळे आता आगामी नगर परिषद निवडणूकीत निवडूण येण्यासाठी मतांची जुडवाजूडव करीत असतांना मागील उमेदवारासोबत निवडणूक लढवावी की अन्य एखाद्या इच्छूक उमेदवाराला सोबत घेऊन निवडणूक लढवलेली चांगली या उद्देशाने कामाल्या लागलेले विद्यमान नगरसेवक हाजी कुरेशी हे प्रभागातील सहकारी उमेदवार बदलणार याची कुणकूण कानावर जाताच सहकारी नगसेवक बागवान यांचे पती माजी नगरसेवक चाँदसाहब बागवान व त्यांचे बंधू व नगरसेवक हाजी कुरेशी यांच्या बाचाबाची झाली या बाचाबाचीचे रुपांतर पाहता पाहता त्यांच्यासह त्याच्या समर्थक दोन्ही गटांमध्ये तुंफान हाणामारीत झाले अन् क्षणात शहरात सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

शहराबाहेरील बार अँड रेस्टॉरंट मधील तुंबळ हाणामारीचे पडसाद रेल्वे स्थानक परिसरात ही उमटले या सर्व राजकीय दंडेलशाहीचे चित्रण बार मधील सिसीटीव्ही मध्येही कैद झालेच असेल हा सर्व प्रकार घडत असतांना नेहमी प्रमाणे 'चोर सोडून सन्याश्याला फासावर लटकवल्यागत' व्यापाऱ्यांसह शहरातील जनसामान्यांना नागरिकांना ही भोगावे लागले अनेक व्यापाऱ्यांनी भितीपोटी तर अनेकांनी दडपशाहीपोटी आपआपली दुकाणे धडाधड बंद करून आपआपली घर जवळ केली परंतु ज्यांनी शहरात राजकीय दडपशाहीचा प्रकार करून शहरात दहशत माजवली त्यांनी शेवटी आपआपसात गांधीवादाला प्राथमिकता देऊन समाधानकारक तडजोड करीत स्वतःचा यशस्वीपणे कायद्याच्या कचाट्यातून बचाव करून घेतला असल्याचे दिसत असले तरी शेवटी हा सर्व गंभीर कायदा व सुव्यवस्थेची नाचक्की करून गेला....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या