💥उड्डाणपुलामुळे होणार्‍या गैरसोयी बाबत जनहित याचिका दाखल ; हायकोर्टाच्या संबंधित विभागांना नोटीस....!


💥माजी नगरसेवक भास्कर मामा चाटे यांनी केली याचिका दाखल💥

परळी, (प्रतिनिधी) - धोकादायक उड्डाणपुल प्रकरणात परळीकरांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणात मुख्य न्या.दीपांकर दत्ता आणि न्या. एन. बी. सूर्यवंशी यांनी प्रतिवादी राष्ट्रीय महामार्ग विभाग व व्यवस्थापक, दक्षिण मध्यरेल्वे विभाग सिकंदराबाद, बीड जिल्हाधिकारी आणि परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावली. ओव्हरब्रिज मुळे होणाऱ्या गैरसोयीला परळीच्या नागरिकांना रोजच तोंड द्यावे लागत आहे. शिवाजी नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, नागसेन नगर, व अशा अनेक वसाहती सह थर्मल कॉलनी, तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी उडान पुलावरूनच जावे लागते दर दिवसाआड ट्रॅफिक जाम किंवा किरकोळ अपघात येथे होत असतात. याकडे जनहित याचिकेत भास्कर मामा चाटे यांनी लक्ष वेधले आहे. शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात येणे व जाने करावे लागते रस्त्यावरून जातात त्यांच्या जीवितास वाढलेली वाहतूक व गैरसोयीचा उड्डाणपूल अडचणीचा ठरत आहे. याचिका दाखल कर्त्याने यापूर्वी ब्रिज ऐवजी पर्यायी भुयारी मार्ग ची आवश्यकता व ब्रिजची लांबलेली लांबी कमी करून देण्यात यावी अशा प्रकारची जनहित याचिका  दाखल केली आहे.

परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक भास्कर मामा चाटे यांनी अॅड. संभाजी जी. मुंडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल करत, परळीकरांच्या समस्या मांडल्या आहेत. याचिकेत म्हटल्यानुसार, शहरातील पश्चिमीकडील भागातील व व ग्रामीण परिसरातील जवळपास 35 हजार लोकसंख्या राहते या भागात सहा ते सात प्राथमिक व माध्यमिक शाळा ,महाविद्यालय आहेत या सर्वांना शहरात ये-जा करण्यासाठी उड्डाणपुलाचाच वापर करावा लागतो त्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग नसल्यामुळे पर्यायी भुयारी मार्ग परळी शहरात येण्या-जाण्यासाठी करावा.भास्कर मामा चाटे यांच्या प्रयत्ना ने भुयारी मार्गाची मंजुरी 2009-10 साली रेल्वे प्रशासनाने  दिली आहे.

@@@@@

*दुरुस्तीसाठी २२५ लाखांचा खर्च*

     शहरातील या उड्डाणपुलाला दोन सर्व्हिस रोड आहे. मात्र रेल्वे भागातील लोकवस्तीला रेल्वे लाईन आल्याने या उड्डाणपुलाच्या वापराशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे उड्डाणपुलावर सकाळी आणि रात्री प्रचंड गर्दी होते. वाहतूक कोंडी होते. कोंडी फोडण्यासाठी एक ते तीन तास लागतात. त्यामुळे दोन रेल्वे लाईन ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग जर केला तर सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी २२५.२७ लाख रुपयांचा खर्च आहे. यासोबतच भूयारी मार्गाचे काम मार्गी लावण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या