💥पुर्णा तालुक्यातील आहेरवाडीत बुध्द विहाराच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती साजरी...!


💥सम्राट अशोक मित्र मंडळाने केला सामाजिक बांधिलकी जोपासन्याचा कौतुकास्पद उपक्रम💥


💥सम्राट अशोक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन💥

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - सामाजिक बांधिलकी जोपासत दोन समाजातील सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या निर्मळ हेतूने तालुक्यातील मौ.आहेरवाडी या गावात सम्राट अशोक मित्र मंडळाच्या वतीने गावातील बौद्ध विहाराच्या प्रांगणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती काल शनिवार दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.


यावेळी सम्राट अशोक मित्र मंडळाच्या वतीने महापुरूषांच्या जिवनावर आधारीत निबंध स्पर्धेसह वकृत्व स्पर्धा तसेच १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या स्पर्धांमध्ये ११७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या भव्यदिव्य शिवजयंती महोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आहेरवाडी ग्रामपंचायचे सरपंच ऋषीकेश मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती तर प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सकाळचे तालुक्यातील जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड सर शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे,पुर्णा नगर परिषदेचे मा.नगरसेवक तथा बहुजन समाज पक्षाचे नेते देवराव खंदारे,गावातील प्रतिष्ठित नागरिक विक्रम मोरे,रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी,बाबाराव खिल्लारे,नारायन महाराज,योगेश खंदारे,केशव खंदारे,सुभाष मोरे,गौतम खंदारे कुंडलीक मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट अशोक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संकल्प कोचिंग क्लासेसचे संचालक राजु खंदारे गौतम नाना राऊत रुस्तूम दिपके,सुनिल खंदारे,संजय बरबते,संजय राऊत,भिमा खिल्लारे,गौतम खिल्लारे,श्रीकांत राऊत,राहूल दिपके,लक्ष्मण खंदारे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक बहाल करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनील खंदारे यांनी तर आभार प्रदर्शन गौतम राऊत यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या