💥मंगरूळपीर पोलिस स्थानकात दाखल खुनाच्या गुन्हयातील आरोपीस मा.सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...!


💥आरोपीने हत्या केलेल्या मयतास प्रथमतः धारदार कोयत्याने मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतुने मृतदेह विहिरीत फेकला होता💥

वाशिम:-मा.पोलीस अधिक्षक श्री. बच्चनसिंह सा. यांचे मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हयामध्ये वेगवेगळे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असून पोलिस स्थानकांच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. तसेच न्यायालयीन कामकाजामध्ये ट्रायल मॉनिटरींग समिती कडून साक्षीदार यांना मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे.

                पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दिनांक ०२/१२/२०१२ रोजी फिर्यादी नामे विजय महादेव खडसे वय २२ वर्ष रा.वाडा फॉर्म यांनी फिर्याद दिली की, आरोपी नामे गोपाल शेषराव पाटील रा. मंगळसा यांने गुन्हयातील मयत नामे अजय महादेव खडसे वय १८ वर्ष रा.वाडा फॉर्म हा मृतकाची आई व आरोपी गोपाल शेषराव पाटील यांचेत असलेल्या प्रेम सबंधाला विरोध करीत असल्याचे कारणावरून आरोपी गोपाल पाटील याने दिनांक ३०/११/२०१२ ते ०२/१२/२०१२ च्या दरम्यान मृतक यास धारदार शस्त्राने कोयत्याने मारून जिवाने ठार मरले व पुरावा नष्ट करण्याचे उद्येशाने प्रेत विहीरीत फेकून दिले. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे.मंगरूळपीर येथे अप क्र. १८२/२०१२ कलम ३०२, २०१ भा.द.वी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचे तत्कालीन तपास अधिकारी पो. नि. एस.एल. दोनकलवार यांनी गुन्हयाचा सखोल साक्षी-पुराव्यासह तपास करून गुन्हयाचे दोषारोप पत्र १२/२०१३ दिनांक २८/०२/२०१३ अन्वये सत्र न्यायालय वाशिम येथे दाखल केले गुन्हयाचा सिसिनं.३५/२०१३ दिनांक १/०३/२०१३ अन्वये प्राप्त झाला.

सदर गुन्हयाचा कोर्ट केस नं.७२/२०१३ खटला जिल्हा व सत्र न्यायालय मंगरूळपीर येथे मा.न्यायाधिश रचना आर. तेहरा याच्या समक्ष दिनांक २३/०२/२०२२ पावेतो चालला. मा. न्यायाधिश तेहरा मॅडम यांनी दोन्ही पक्षाची बाजू एकून घेवून आरोपी गोपाल शेषराव पाटील रा.मंगळसा हे दोषी आढळून आल्याने त्यांना कलम ३०२ भा.द.वी मध्ये जन्मठेप व नगदी १०००रू. दंड व तसेच कलम २०१ भा.द.वी मध्ये ३ वर्ष कारावास व नगदी ५००रू. दंडाची शिक्षा केली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.नि. दोनकलवार यांनी व त्यांचे लेखनिक यांनी योग्य रित्या करून गुन्हयातील फिर्यादी स न्याय मिळाला.सदर प्रकरणी सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता ॲङ श्री.पी.एस.ढोबळे यांनी काम पाहीले. तर मा. पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक सुनिल हूड यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ना.म.पो.कॉ. पुष्पा कांबळे ब. नं. ११९० यांनी कामकाज पाहीले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या