💥मालेगांव तालुक्यातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष नगरीत मोक्षमाला रोपण महोत्सव निमित्त लाभार्थी परिवारांचा सत्कार...!


💥यावेळी तप आराधना कार्यक्रमात सुमारे दोनशे तपस्वी महिला पुरुष व बालक मंडळीनी सहभाग घेतला💥


फुलचंद भगत

वाशिम:-जिल्ह्यातील मालेगांव तहसील अंतर्गत असलेल्या शिरपूर जैन या जैनांची काशी असलेल्या अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या अंतरिक्ष नगरीत आयोजित मोक्षमाला रोपण कार्यक्रम उत्साह व मंगलमय वातावरणात शांततेत पार पडला.

स्थानिक पारसबाग परिसरात आचार्यश्री हंसकीर्ती सुरीश्वरजी महाराज,आचार्यश्री भव्यकीर्ती सुरीश्वरजी महाराज,पूज्य मुनिराज विश्वरक्षित विजयजी महाराज,अंतरिक्ष तीर्थ उद्धारक पंन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज,पंन्यास प्रवर श्री परमहंस विजयजी महाराज व पूज्यश्री आत्मदृष्टी विजयजी महाराज आदी संत तथा साध्वीच्या मार्गदर्शनात १ जानेवारी २०२२ ला उपधान तप महोत्सवाची सुरवात करण्यात आली होती.या तप आराधना कार्यक्रमात सुमारे दोनशे तपस्वी महिला पुरुष व बालक मंडळीनी सहभाग घेतला होता.शनिवार १९ फेब्रुवारी रोजी मोक्षमाला रोपण महोत्सवानिमित्त तप आराधना कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या लाभार्थी परिवारांचा बहुमान करण्यात आला.


यावेळी शिरपूर गावातून शोभायात्रा न काढता पारसबाग परिसरातच या धार्मिक महोत्सवाचा समारोप करण्यात आला.धार्मिक तप आराधानेत अकोला,वाशिम, मुंबई,अहमदाबाद,सुरत,पुणे,नाशिक,नागपूर, हिंगोली,बाळापूर,परभणी,मालेगांव,शेगांव,लोणार,बुलडाणा,दारव्हा,जलगांव खान्देश,कळमनुरी,अमरावती,पुलगाव,पुसद,चंद्रपूर,सावनेर,औरंगाबाद,बैतुल,आशिफाबाद,हिंगणघाट,खामगांव,दिग्रस,मांढेली,उमरखेड,यवतमाळ,ढानकी,वरोरा,रत्नागिरी आदी ठिकाणच्या जवळपास दोनशे आराधकांनी तब्बल दोन महिने सहभाग घेऊन आराधना केली.कार्यक्रमा दरम्यान कांदिवली मुंबई येथील जैन नवयुवकांचा पार्श्व नेमी जैन बैंड पथक महोत्सवात सर्वांचे आकर्षण ठरला.यावेळी अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे ज्येष्ठ व माजी मॅनेजिंग ट्रस्टी साकरचंद शाह,मॅनेजिंग ट्रस्टी दिलीपकुमार शाह,विश्वस्त प्रकाशचंद सोनी,पारसमल गोलेच्छा,मूलचंद संचेती,डॉ.मिलन संचेती, राजेश मालिया,प्रकाशचंद कोठारी,शिखरचंद बागरेचा,हेमंत गांधी,शैलेश गेलडा नवीन मालिया,आनंद सुराणा,संजय संघवी,भद्रेश मेहता अशोक गेलडा,राजेश गेलडा आदींसह मोठ्या संख्येत श्वेतांबर जैन समाजाचे बांधव व भगिनींनी उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या