💥बुलडाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती दिनी अभिवादन....!


💥पत्रकार भवन येथे पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन केले💥

 ✍️ मोहन चौकेकर

बुलढाणा  :  बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या २० फेब्रुवारी या जयंती दिनानिमित्त पत्रकार भवन येथे पत्रकारांनी अभिवादन केले. 

सायंकाळी आयोजित या अभिवादन सोहळ्यात बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पत्रकारांनी पुष्पअर्पण केले. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष लहाने, भानुदास लकडे, गजानन धांडे, निलेश जोशी, लक्ष्मीकांत बगाडे, नितीन शिरसाट, रविंद्र गणेशे, दिनेश मुडे, रणजितसिंह राजपूत, कासिम खलील, विनोद सावळे, प्रेमकुमार राठोड, गणेश उबरहंडे, संदीप वंत्रोले, सिद्धार्थ आराख, शौकत अली, सुनिल तिजारे आदी उपस्थित होते. 

मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकर यांचा महनिय व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करून २० पेâब्रुवारी रोजी दरवर्षी शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मुंबईत अभिवादन केले. आज शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने बहुतेक सरकारी कार्यालयात जयंती साजरी झाली नसलीतरी मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार राज्यभर ही जयंती साजरी करण्यात आली.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते. या घटनेला १९० वर्षे झाली आहेत. दर्पणच्या स्मरणार्थ ६ जानेवारी रोजी राज्यात पत्रकार दिन साजरा केला जातो. बाळशास्त्री हे पहिले पत्रकारच नव्हते तर मोठे विद्वान होते. समाजसुधारक, आधुनिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक असलेल्या बाळशास्त्री यांना ९ भाषा  अवगत होत्या. २० फेब्रुवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे त्यांचा जन्म झाला तर १७ मे १८४६ रोजी अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त एस.एम.देशमुख यांनी पत्रकार व जनतेस शुभेच्छा दिल्या. 

बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा दिला होता जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांनी ;। 

बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनाला ६ जानेवारी २०१६ या पत्रकार दिनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वैशिष्ट्यपूर्ण असा अर्धाकृती पुतळा जेष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांच्या सौजन्यातून दिला गेला होता. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात जिथे-जिथे पत्रकार भवन होईल, तिथे-तिथे बाळशास्त्री जांभेकरांचा पुतळा देण्याची घोषणा सुध्दा राजोरे यांनी केली आहे. आज त्याच पुतळ्याला अभिवादन करुन बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या