💥रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अंतर्गत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश...!


💥श्री बाकलीवाल विद्यालयाच्या बहुसंख्य विद्यार्थी व एनसीसी कॅडेटनी सहभाग घेत घवघवीत यश संपादन केले💥 

फुलचंद भगत

वाशिम - आंतरराष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाअंतर्गत आजादी का अमृत महोत्सव निमित्त १७ ते २४ जानेवारी दरम्यान आयोजीत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या बहुसंख्य विद्यार्थी व एनसीसी कॅडेटनी सहभाग घेत घवघवीत यश संपादन केले ही स्पर्धा ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा आमदपूर, लातुर मास संलग्न असलेल्या राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनच्या ट्रान्सपोर्ट अँड ट्रॅव्हल विंग, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुक्रमाबादच्या वतीने घेण्यात आली होती.

    या स्पर्धेत माध्यमिक गटातून राज्यातुन प्रथम क्रमांक कॅडेट नंदिनी वानखेडे, द्वितीय रूचिता वानखेडे, तृतीय दिव्या लहानकर यांनी पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांना ई प्रमाणपत्र व रोख रक्कम ऑनलाईन देऊन गौरविण्यात येणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे ११ महाराष्ट्र बटालीयन एनसीसी अकोलाचे कमांडिंग ऑफिसर चंद्रा प्रकाश बदोला, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुअ दंभीवाल, पर्यवेक्षीका सौ. भोंडे व एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतुक केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या