💥गुजरात मधील अहमदाबाद सिरियल बॉम्बस्फोटातील ३८ दहशतवादी शैतानांना फाशीची शिक्षा....!


💥सन २००८ या वर्षी दहशतवादी शैतानांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात ५६ जणांचा मृत्यू झाला होता💥

अहमदाबाद (दि.१८ फेब्रुवारी) गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे दहशतवादी शैतांनांनी घडवलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील ३८ दहशतवादी शैतानांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.अहमदाबादेत २४ जुलै २००८ रोजी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात ५६ निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत महत्वाचा मानला जातोय.

अहमदाबादमधील २००८ च्या साखळी बॉम्बस्फोटांचा खटल्याचा निकाल जलदरित्या लावण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने ४९ पैकी ३८ दोषींना युएपीए आणि आयपीसी ३०२ च्या अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली तर इतर ११ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या