💥पुर्णा शहरातील दुर्धर आजारग्रस्त कुटुंबास उदरनिर्वाहासाठी शेळी भेट...!


💥परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज( एचएआरसी) संस्थेचा उपक्रम💥

पूर्णा (दि 23 फेब्रुवारी) - परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज ( एचएआरसी) या संस्थेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील एका दुर्धर आजाराने ग्रस्त कुटुंबास उदरनिर्वाहासाठी शेळी आणि दोन पिल्ले बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी भेट म्हणून देण्यात आले

पूर्णा शहरातील झोपडपट्टी भागातील एक गरीब कुटुंब दुर्धर आजाराने पीडित असून त्यांना जास्त श्रमाचे काम होत नाही. त्यांना एक मुलगा असून ते 12 विला शिकत आहे,शिवाय तो अभ्यासात हुशार आहे पण घरातील अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो देखील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आहे. त्यांच्याशी बोलून त्यांची अडचण समजून घेतल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी शेळी पालन करण्यासाठी शेळी व शेळीच्या पिल्लू ची मागणी केली होती,त्यानुसार आज दि 23 फेब्रुवारी बुधवार रोजी संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त पूर्णा येथे जाऊन ही मदत देण्यात आली तसेच 12 वी ला शिकत असलेल्या त् मुलास देखील CET साठी एचएआरसी संस्थे तर्फे पालकत्व स्वीकारण्यात आले कार्यक्रम यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, राजेश्वर वासलवार, पुरुषोत्तम काळदाते व सत्यनारायण चांडक, रवी मौर्य  यांनी प्रयत्न केले.

बारा वर्षापासून उपक्रम :-

 होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्था मागील 12 वर्षा पासून एचआयव्ही संक्रमित बालके, निराधार विधवा महिला व अनाथांच्या मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनपर गरजांसाठी नियमितपणे प्रयत्न करते. तसेच एचएआरसी संस्थे तर्फे आजवर  महाराष्ट्रातील अनेक विशेष बालगृहातील एचआयव्ही ग्रस्तांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन साठी वेळोवेळी मदत  केली जात आहे. 

एचएआरसी संस्थे तर्फे आजवर 38 निराधार, एचआयव्ही ग्रस्त, विधवा महिला व अनाथ मुलींना 31 शिलाई मशीन, 2 डाळ काढायची मशीन, 2 पिठाची गिरणी व 1 बेंटेक्स दागिन्यांचे फिरते दुकान द्वारे स्वयंरोजगार उदरनिर्वाहासाठी मदत केली आहे.

प्रतिक्रिया :- डॉ.पवन चांडक अध्यक्ष एचएआरसी संस्था परभणी



  दुर्धर आजारग्रस्त व अनाथांसाठी एचएआरसी संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देताना म्हणाले "समाजातील दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना स्वावलंबी होण्यासाठी व स्वयंरोजगार व प्रशिक्षण साठी जी पण भविष्यात मदत लागेल ती एचएआरसी संस्थेतर्फे पुरविली जाईल. सर्व रुग्णांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नियमितपणे उपचार, पोषक व संतुलित आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या सुख दुःखात एचएआरसी संस्था सदैव आपल्या सोबत आहे".

*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या