💥राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन....!

 💥राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख  शरदचंद्र पवार  यांचे विचार घराघरात पोहचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार व विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली व कारंजा नप माजी नगराध्यक्ष  दत्तराज डहाके,प्रदेश सचिव  बाबारावजी खडसे,प्रदेश चिटणीस पांडुरंगजी ठाकरे,अकोला जिल्हा पक्ष निरीक्षक सोनालिताई ठाकूर,यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक  अशोक परळीकर, वाशिम जी.प माजी सभापती हेमेन्द्र ठाकरे,राका युवा नेते देवव्रत डहाके व प्रदेश चिटणीस सुधाकर गर्जे यांच्या प्रमुख उपस्थितत राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन २७ फेब्रुवारी रोजी स्थानीय पुंजानी कॉम्प्लेक्स हॉल कारंजा येथे दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे.या सदस्य नोंदणी अभियानात सर्व  आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या