💥शिवाजी महाराजांची शिकवण दैनंदिन आयुष्यात आपल्या कृतीत व पोलीस कामकाजात उतरवावी'- पोलिस अधिक्षक बच्चनसिंह


💥त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली💥

(फुलचंद भगत)

वाशिम (दि.१९ फेब्रुवारी) :- जिल्हा पोलीस दलामध्ये श्री.बच्चन सिंह(आयपीएस) यांनी पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवनविन उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने आज दि.१९.०२.२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली.


यावेळी ऊपस्थितांना संबोधित करतांना पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप' या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण प्रत्यक्ष जीवनात व दैनंदिन पोलीस कामकाजात कशी उतरवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

१) 'आपल्या ध्येयाप्रती टाकलेले लहानात लहान पाऊलसुद्धा आपल्याला भविष्यात मोठ्यात मोठे ध्येय गाठण्याकरिता

सहायक ठरते.'

२) ‘शत्रू कितीही बलवान असला तरी त्याला आपण आपल्या ध्येय व उत्साहाने पराभूत करू शकतो.'

३) 'जेव्हा आपला ध्येयाप्रती असलेला निश्चय दृढ असेल तेव्हा मार्गात येणारे संकटांचे डोंगर कितीही मोठे असले तरी ते संकट मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे भासेल.'अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे व कार्यशैलीने प्रेरित होऊन पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सरंक्षण व सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नशील असून वाशिम जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे. पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कल्याण शाखा यांच्यामार्फतीने पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसाठी पदोन्नती सोहळा, नूतन वर्षाभिनंदन, ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा असे विविध कल्याणकारी उपक्रम राबविले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे बुस्टर डोस लसीकरणाचे आयोजन केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासन नीतीचा प्रत्यय येतो.

सदर कार्यक्रम मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे(IPS), परिविक्षाधीन सहायक पोलीस अधिक्षक महक स्वामी(IPS), पो.नि.श्री.ब्रम्हदेव शेळके, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह), पो.नि.श्री.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे उपस्थितीत पार पडला. त्यानंतर पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भेट देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करत सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या