💥शिवसेनेच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन....!


💥कार्यक्रमाचे संयोजक शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे💥

✍️मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद २६ फेब्रुवारी

शिवसेनेच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त दिनांक २७ फेब्रुवारी रविवार रोजी ,वेळ दुपारी १:०० वाजता. मातृभूमी प्रतिष्ठान, संपर्क कार्यालय, क्रांतीचौक, संभाजीनगर या ठिकाणी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांची जयंती. मराठी भाषेच्या जडणघडणीत कवी कुसुमाग्रज यांचा मोठा हातभार होता म्हणून याच दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषेच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या वतीनेही कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. या कवी संमेलनासाठी नामवंत कवींना आमंत्रित करण्यात आले असून यात प्रा. डॉ.ललित अधाने ,प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, प्रा. डॉ. शिवाजी हूसे , प्रा. डॉ.समाधान इंगळे, डॉ. हबीब भंडारे, श्री मनोज खुटे, श्री सुनील उबाळे, सौ माधुरी चौधरी हे आपली कविता सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे राज्यमंत्री अब्दुल सत्तार,आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संयोजकांच्या वतीने कवी प्रेमी, रसिक प्रेक्षकांसाठी प्रवेश खुला ठेवण्यात आला असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, जयवंत ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, राजेंद्र राठोड, शहर प्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाल कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक सुनिता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनिता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, समन्वय कला ओझा, युवा सेनेचे उपसचिव उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या