💥पुर्णा तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या विकासाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे सपशेल दुर्लक्ष...!


💥तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक महत्वाची जागृत देवस्थानं विकासाच्या प्रतिक्षेत💥


[तालुक्यातील कंठेश्वर येथील गोदावरी-पुर्णा संगमावरील जागृत ऐतिहासिक श्री.कोठेश्वर महादेव देवस्थान]

पुर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी निदान पर्यटनाला चालना मिळेल या दृष्टिकोणातून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातल्या पवित्र व जागृत अश्या देवस्थानांच्या विकासाकडे तरी निदान लक्ष देऊन या देवस्थानांचा विकास करण्याचे पवित्र कार्य हातात घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करून या पवित्र अश्या धार्मिक स्थळांना धार्मिक पर्यटन स्थळांचा दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टीने पावले उचलावी अशी अपेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे.


[तिर्थक्षेत्र श्री.गंगाजी बापू देवस्थान पिंपळगाव लिखा]

तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल मधील गौर मधील हेमाडपंथी सोमेश्वर महादेव देवस्थान,कंठेश्वर येथील गोदावरी-पुर्णा नदीच्या संगमावरील ऐतिहासिक व जागृत श्री.कोठेश्वर महादेव देवस्थान तसेच लिखा पिंपळगाव येथील श्री गंगाजी बापू देवस्थान या तिनही जागृत देवस्थानांच्या विकासाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी व पर्यटनाला चालना देणारी ही देवस्थान विकासाच्या प्रतिक्षेत अंतिम घटीका मोजत असल्याचे निदर्शनास येत असून गौर येथील श्री सोमेश्वर देवस्थान समोरील हेमाडपंथी बारवाची अक्षरशः पडझड झाल्यामुळे सदरील बारव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर कंठेश्वर येथील गोदावरी-पुर्णा नद्यांच्या संगमावरील अत्यंत ऐतिहासिक पुरातनकालीन श्री कोठेश्वर महादेव मंदिराचा मागील काही अवशेष पडझडीस आल्याचे निदर्शनास येत आहे. 


[पुर्णा-चुडावा-नांदेड मार्गावरी गौर येथील हेमाडपंथी मंदिर व बारव असलेले जागृत श्री.सोमेश्वर महादेव देवस्थान]


तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल मधील गौर स्थित श्री.सोमेश्वर महादेव देवस्थान,पिंपळगाव लिखा येथील श्री.गंगाजी बापू देवस्थान,कंठेश्वर येथील श्री.कोठेश्वर महादेव देवस्थान व गोदावरी-पुर्णा संगमावरील घाटाच्या सर्वांगिन विकासाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष दिल्यास व धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून तिन्ही देवस्थानांना मान्यता मिळवून देण्याच्या दिशेने पावल उचलल्यास तालुक्यात पर्यटनाला निश्चितच चालना मिळणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या