💥सिने अभिनेता योगेश भोसले यांचा जन्मभुमी सिरकळस येथे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार...!


💥वन फोर थ्री चित्रपटाच्या 'हे आपलं काळीज हाय' या टॅगलाईनला सोशल मिडियात जोरदार प्रतिसाद💥


ताडकळस/प्रतिनिधी

परभणी जिल्हातल्या पुर्णा तालुक्यातील सिरकळस येथील चित्रपट अभिनेता योगेश भोसले यांची मध्यवर्ती भुमीका असलेला व त्यांनीच दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट 'वन फोर थ्री' महाराष्ट्रात 4 मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शीत होत असुन, या  सिनेमाच्या प्रमोशनसाठी योगेश भोसले व वन फोर थ्रीची सर्व टिम परभणी दौऱ्यावर आलेली असुन सिने अभिनेता योगेश भोसले यांचे जन्म गाव असलेल्या सिरकळस येथे दि.23 फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासह सिने अभिनेत्री शीतल अहिरराव, अभिनेता वृषभ शहा आदी कलाकारांची उपस्थिती होती प्रारंभी गावकऱ्यांच्या वतीने योगेश सह वन फोर थ्रीच्या सर्व कलाकारांची गावामध्ये बैलगाडी व घोड्यावरुन मिरवणुक काढुन भव्य सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलतांना योगेश भोसले यांनी बालपणीच्या आठवणींना उजळा दिला. आपण सामन्य शेतकरी कुटुंबातून पुढे येत 14 वर्षाच्या संघर्षा नंतर चित्रपटसृष्टीत स्व:ताचे अस्तीत्व कसापद्धतीने निर्माण केले हे सांगत असतांना भावनीक होत कुटुंबीयांनी दिलेला पाठींबा, जेष्ठ विधिज्ञ अँड.माधवराव भोसले व समस्त गावकऱ्यांचे मार्गदर्शन व प्रेम आपण कधीही विसरु शकत नाही असे सांगीतले. विशु व मधूच्या प्रेमाची अनोखी केमिस्ट्री  असलेला 'वन फोर थ्री' हा चित्रपट पाहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमास पांडुरंग (मामा) भोसले, रंगनाथराव भोसले, लिबांजीराव भोसले, गणेशराव आंबोरे, सरपंच प्रतिनिधी माणिकराव भोसले, दिलिपराव आंबोरे, बालाजी रुद्रवार, दिपक नाना आंबोरे, कैलास आप्पा काळे, शिवाजी आवरगंड, गणेशराव गाडवे, संभाजीराव भोसले, नागनाथ देशमुख, प्रा.एन.जी.शिंदे, पंडित भोसले, माधव आवरगंड, नंदेशजी घोन्सीकर, शामराव आंबोरे, सदशिव भोसले, उत्तमराव शिंदे, वसंत तनपुरे आदीसह ताडकळस, माखणी, बानेगाव, बलसा, मिरखेल, तामकळस, खडाळा सह पंचक्रोशीतील नांगरीकांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी सरपंच संजयराव भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो.पा.माणिकराव  भोसले, पत्रकार धम्मपाल हानवते, कामाजी भोसले, हारीभाऊ भोसले, विष्णुकाका भोसले, भारतराव भोसले, बाळुकाका भोसले, गणेश भोसले, दिपक भोसले, रेश्माजी भोसले, डिगांबर भोसले, गजानन भोसले, भागवत भोसले, बबनराव भोसले, बापुराव भोसले, चक्रधर भोसले, कृष्णा भोसले , ज्ञानेश्वर भोसले, बालाजी भोसले, भगवान भोसले, दत्तराव भोसले, शंकर भोसले, गोविंद भोसले, राजु खंदारे, संतोष खंदारे आदीसह सिरकळस येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. 

----------------------------------------------------

विशु-मधूच्या प्रेमाची अनोखी प्रेमकहाणी 'वन फोर थ्री' 

----------------------------------------------------

यावेळी बोलतांना चित्रपट कलावंत योगेश भोसले यांनी सांगीतले की, 'वन फोर थ्री' या मराठी चित्रपटामध्ये अनोख्या पद्धतीने व मराठी सिनेमाच्या कक्षा रुंदावनारी असी विशु-मधूच्या प्रेमाची अनोखी प्रेमकहाणी असुन कोरोना महामारीच्या पाश्वभुमीवर चित्रपटाचे चित्रीकरण करत असतांना अंत्यत परिश्रमपुर्वक आमच्या सर्व टिमने काम केले आहे. 4 मार्च रोजी सर्वत्र चित्रपट प्रदर्शित होत आहे. दाक्षिणात्य चित्रपटाची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला प्रयोग आम्ही केला असुन जास्तीत जास्त मराठी रसिकांनी हा चित्रपट पाहण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले.

'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' आणि  विरकुमार शहा निर्मित दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित 'वन फोर थ्री' या चित्रपटात अभिनेता वृषभ शहा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असुन विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे तर संगीतकार पी. शंकरम यांनी ऱ्हदयस्पर्शी संगीतचा साज चडवीला आहे. छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात कलात्मक छायाचित्रण केले आहे. 'हे आपलं काळीज हाय' व 'करील तर मामाचीच' या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनला सोशल मिडियावर सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत असुन हा चित्रपट पाहण्याची तरुणाई मध्ये उत्सुकता दिसून येत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या