💥पुर्णा तालुका डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाडी समिती कडून शिवजयंतीनिमित्त शिवचरित्राचे वाटप...!


💥कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाच्या १११ प्रती वाटपाचे नियोजन करण्यात आले होते💥

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया पूर्णा तालुका समितीकडून आज शनिवार दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी  शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.


    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा व कार्याचा जयघोष देशभर व जगभर होतच असतो. त्यासोबतच त्यांचे कार्य व चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे म्हणून डी वाय एफ आय पूर्णा या युवक संघटनेकडून कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाच्या १११ प्रती वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. संघटनेला हि पुस्तके मोफत वाटायची इच्छा होती परंतु बरेच जणांना त्याचे मूल्ये राहत नाही म्हणून ४० रु किंमतीचे पुस्तक केवळ 5 रुपयात देण्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

       या उपक्रमात डी वाय एफ आय चे जिल्हासचिव नसीर शेख, तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे आणि तालुकासचिव अमन जोंधळे, सहसचिव अजय खंदारे, कोषाध्यक्ष जय एंगडे, संग्राम नजान आदींचा सहभाग होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या