💥पुर्णा शहरासह तालुक्यात सर्वत्र 'गाढव राज' ? गाढवशाहीला त्रस्त शेतकरी अन् सर्वसामान्य समाज...!

 


💥तालुक्याची अर्थव्यवस्था गाढवांच्या हाती ; भ्रष्ट अधिकारी अवैध रेती तस्करांची झपाट्याने प्रगती💥


💥तालुक्यात शैकडो गाढवांसह मोकाट गुरांचा सर्वत्र मुक्त संचार ; रेती तस्कर भ्रष्ट अधिकारी देताय एकमेकांना आधार💥


पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नद्यांचा कधी काळी तालुक्यातील शेती उद्योगाला फार मोठा आधार होता परंतु आता मात्र या नद्यांच्या काठावरील शेतकऱ्यांना अवैध रेती तस्करांसह त्यांनी रेती वाहतूकीसाठी पोसलेली शेकडो गाढव अक्षरशः डोकेदुखी ठरत असून संबंधित गाढवांच्या झुंडी परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर तुटून पडत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू ढाळावे लागत आहे परंतु शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतर ही त्यांच्या तक्रारींची ना महसुल प्रशासनाकडून दखल घेतली जाते ना नगर परिषद प्रशासनाकडून दखल घेतली जाते नाही पोलिस प्रशासनाकडून त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटी तक्रार करायची तरी कोणाकडे ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.


पुर्णा शेत शिवारातील शेतकऱ्यांना तर अवैध रेती तस्करांनी पोसलेल्या शेकडो गाढवांस असंख्य प्रमाणात असलेल्या मोकाट गुरांचाही मोठ्या प्रमाणात त्रास तोंडात मुग गिळून मुकाट्यान सोसायची वेळ आली आहे या मोकाट जनावरांच्या त्रासा संदर्भात अनेक वेळ नगर परिषद प्रशासनाकडे शेतकऱ्यांकडून लेखी स्वरूपात तक्रारी दिल्यानंतर सुध्दा नगर परिषद प्रशासनाकडून मोकाट गुरांसह गाढवांवर कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे शंकेची पाल चुकचूकतांना दिसत आहे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा महसूल प्रशासनाचे नायब तहसिलदार बि.नितेशकुमार यांच्याकडे दुहेरी पदभार असून पुर्णा शेत शिवारातील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारींसह अन्य शेत शिवारातील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारींची दखल घेण्याचा संपूर्ण अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे त्यामुळे निदान त्यांनी तरी या मोकाट जनावरांसह सर्वत्र हैदोस घालणाऱ्या शेकडो गाडवांच्या विरोधात कठोर पावल उचलावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून गाढवांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा करून या चोरट्या रेतीची चढ्या भावाने विक्री होत असल्यामुळे असंख्य रेती तस्कर मोठ्या गर्वाने गाढवांच्या साम्राज्याचे अधिपती अर्थात 'गाढव सम्राट' बनून शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकांना डोकेदुखी निर्माण करीत आहे भल्या पहाटे शेतकरीवर्ग झोपेतून उठण्यापुर्वी पुर्णा-गोदावरी नदीपात्रात अवैध चोरट्या वाळूची वाहतूक करण्यासाठी शेकडो गाडवांच्या झुंडी उतरत असल्यामुळे या गाढवांच्या झुंडी नदीपात्राच्या काठावरील शेतातल्या उभ्या पिकांवर तुटून पडत असून यानंतर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी दिवस उजडूस्तोर शहरातील अनेक भागात कर्णकर्कष नैसर्गिक सायरणचा आवाज काढीत धुमाकून घालत असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या अक्षरशः झोपी उडाल्या आहेत.

💥तालुक्यात तिस ते पस्तीस 'गाढव सम्राट' शासकीय गौण-खनिज रेतीची लावताय अक्षरशः वाट ;-तालुक्यात तब्बल तिस ते पस्तीस गाढव पोसणारे गाढवांचे मालक अर्थात  'गाढव सम्राट' असून त्यांनी पोसलेली शेकडो गाढव अवैध रेती तस्करीतून त्यांच्यासह भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अर्थप्राप्तीचे साधन झाले असले तरी मात्र सर्वसामान्य जनतेच्या मानसिक तर शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरत आहेत महसुल प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने संयुक्त कारवाई करून तात्काळ या शेकडो गाढवांसह असंख्य मोकाट जनावरांवर व त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या