💥शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या अंतरिक्ष नगरीत आयोजित मोक्षमाला रोपण महोत्सवाचा समारोप...!


💥जानेवारी महिन्यात उपधान तप महोत्सवाची सुरवात करण्यात आली होती💥

फुलचंद भगत

वाशिम : जिल्ह्यातील मालेगांव तहसील अंतर्गत असलेल्या शिरपूर जैन या जैनांची काशी असलेल्या अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या अंतरिक्ष नगरीत आयोजित मोक्षमाला रोपण कार्यक्रमाचा समारोप उत्साह व मंगलमय वातावरणात रविवारी पार पडला.


स्थानिक पारसबाग परिसरात आचार्यश्री हंसकीर्ती सुरीश्वरजी महाराज,आचार्यश्री भव्यकीर्ती सुरीश्वरजी महाराज,पूज्य मुनिराज विश्वरक्षित विजयजी महाराज,अंतरिक्ष तीर्थ उद्धारक पंन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज,पंन्यास प्रवर श्री परमहंस विजयजी महाराज व पूज्यश्री आत्मदृष्टी विजयजी महाराज आदी संत तथा साध्वीच्या मार्गदर्शनात जानेवारी महिन्यात उपधान तप महोत्सवाची सुरवात करण्यात आली होती.उपधान तप कार्यक्रमात सुमारे दोनशे तपस्वी महिला पुरुष व बालक मंडळीनी सहभाग घेतला होता.मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मोक्षमाला रोपण महोत्सव कार्यक्रमाचा रविवारी उत्साहात समारोप करण्यात आला.या धार्मिक तप सोहळ्यात अकोला,वाशिम,मुंबई,अहमदाबाद,सुरत,पुणे,नाशिक,नागपूर, हिंगोली,बाळापूर,परभणी,मालेगांव,शेगांव,लोणार,बुलडाणा,दारव्हा,जलगांव खान्देश,कळमनुरी,अमरावती,पुलगाव,पुसद,चंद्रपूर,सावनेर,औरंगाबाद,बैतुल,आशिफाबाद,हिंगणघाट,खामगांव, दिग्रस,मांढेली,उमरखेड,यवतमाळ,ढानकी,वरोरा,रत्नागिरी आदी ठिकाणच्या दोनशेच्यावर आराधकांनी तब्बल दोन महिने सहभाग घेऊन आराधना केली.यावेळी नाचणगांव येथील ज्येष्ठ समाजबंधु व मोठे दानदाता गिरधारीलाल कोचर,अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे ज्येष्ठ व माजी मॅनेजिंग ट्रस्टी साकरचंद शाह,मॅनेजिंग ट्रस्टी दिलीपकुमार शाह,विश्वस्त मुकेश शाह,अभय शाह,राजेश शाह,प्रकाशचंद सोनी,पारसमल गोलेच्छा,डॉ.संतोष संचेती,मूलचंद संचेती,किशोर सोनी,सिद्धार्थ शाह,मनीष संचेती,सुभाषचंद्र सुराणा,डॉ.मिलन संचेती,राजेश मालिया,प्रकाशचंद कोठारी,हेमंत गांधी,शैलेश गेलडा,संजय संघवी,भद्रेश मेहता अशोक गेलडा,राजेश गेलडा,नवीन मालिया शैलेंश गेलडा,राजेश मालिया,बाबुराव बोराटे,अशोक भन्साली,कौशल जैन आदींसह मोठ्या संख्येत श्वेतांबर जैन समाजाचे बांधव व भगिनी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या