💥भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ओबीसी समाजाच्या पाठिशी : आमदार सुरेशराव वरपूडकर


💥दुसऱ्या पक्ष्यातील तुलनेत ओबीसीचे नेतृत्व पाहता काँग्रेस पक्षातील नेतृवं हे मजबूत असेही आ.वरपूडकर म्हणाले💥

परभणी (दि.२१ फेब्रुवारी) - परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात काल रविवार दि,२०फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अध्यक्ष म्हणून आमदार सुरेश वरपूडकर तर अतिथी म्हणून हरी भाऊ शेळके , बाळासाहेब देशमुख , सुरेश नागरे , बाळासाहेब रेंगे , मालिका गफार , रामभाऊ घाडगे , शुभांगी सिसोदिया , केशवराव बुधवांत ,गुलमीर खान , भगवान वाघमारे , मुंजाभाऊ गायकवाड , गोविंद यादव , सुहास पंडित आदी उपस्थित होते.

या बैठकीत सत्कार मूर्ती म्हणून नानासाहेब राऊत ,अविनाश काळे,वजीर भाई , यांचा सत्कार करण्यात आला तसेच ओबीसी समाजातील बांधवांचा प्रवेश करण्यात आला , या वेळी आमदार वरपूडकर म्हणाले की, दुसऱ्या पक्ष्यातील तुलनेत ओबीसीचे नेतृत्व पाहता काँग्रेस पक्षातील नेतृवं हे मजबूत झाले असल्याचे वरपूडकर म्हणाले , या वेळी नानासाहेब राऊत म्हणाले की झाड कितीही मोठं झाल तरी ते  आतून पोकळ झाला असून केव्हा ही पडू शकत ,त्यावर घर बांधू नका. असे बोलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टोला लगावला या कार्यक्रमाचे आयोजन प्रा तुकाराम साठे यांनी केले तर सूत्र संचालन राहुल वायवळ यांनी तर आभार प्रदर्शन सुहास पंडित यांनी केलं आहे . कार्यक्रम यशस्वी साठी सर्व काँगेस ओबीसी पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.....,,.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या