💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिवाजी महाराजांना ३९२ व्या जयंतीनिमित्त वैचारिक अभिवादन..!


🌈सदर कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती अशोकराव बोकारे यांची प्रमुख उपस्थिती🌈


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) -
तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शनिवार दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती अशोकराव बोकारे, चेअरमन तथा कृ.उ.बा.समिती संचालक माणिकराव बोकारे,पोलिस पाटिल ग्यानोबा बोकारे,तंटामुक्ती अध्यक्ष सोपानराव बोकारे, शा.व्य.समिती अध्यक्ष गंगाधरराव बोकारे,उपाध्यक्ष बालाजी बोकारे, त्र्यंबकराव बोकारे,गोविंदराव बोकारे, सुरेश बोकारे, रघुनाथ बोकारे, हनुमान बोकारे, श्री मुंजाजी बोकारे, श्री बंडूभाऊ बोकारे, श्री मारोती बोकारे, यशवंतराव बोकारे,भानुदासराव बोकारे,बाबुराव बोकारे, तुकाराम खाडे,नामदेवराव बोकारे,मुख्याध्यापक गोविंद नलबलवार सर व असंख्य गावकरी उपस्थित होते.


या कार्यक्रमात भरपूर विद्यार्थिनींनी अगदी छान पोशाख परिधान केला होता,फेटे बांधले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोविंद नलबलवार सर यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र 47 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अप्रतिम, अस्खलित मांडले.विशेषबाब म्हणजे इयत्ता 1 ली पासून ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या सर्वच वर्गांचा भाषणात भरभरून सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री आबनराव पारवे सर यांनी केले कार्यक्रमास अत्यंत उस्फृर्त प्रतिसाद मिळाला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या