💥वाशिम ग्रामीण पोलीसांनी हरवलेली तिन वर्षाची लहान मुलीच्या आई वडीलांचा शोध घेवून दिले ताब्यात...!


💥पोलिस प्रशासनाच्या कार्य तत्परतेचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक💥 

(फुलचंद भगत)

वाशिम (दि.२६ फेब्रुवारी) :-दिनांक 24/02/2022 रोजी 17.15 वाचे सुमारास पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे माहीती मिळाली की,ग्राम काकडदाती फाटा ता.जि.वाशिम येथे एक 3 वर्षाची मुलगी मिळून आली आहे माहीती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी जावून सदर लहान मुलीस ताब्यात घेतले. व तिचे कडे चौकशी केली

असतर सदर मुलीने आपले नाव फक्त दिक्षा असे सांगीतले. तिला तिचे आई वडील याची नावे विचारली असता काही सांगता येत नव्हती. त्यानंतर सदर मुलगी सापडलेल्या ठिकाणी व आजुबाजुच्या परीसरात तिचे आई वडीलांचा शोध घेतला असता ते मिळुन आले नाही.त्यानंतर सदर मुलीस पोलीस स्टेशनला आणले.मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह याचे मार्गदर्शनाखाली सोशल मिडीया व इतर अनेक प्रकारे सदर मुलीच्या आई वडीलांचा शोध घेतला असता अशी माहीती मिळाली सदर मुलगी ही वाशिम शहरानजीक असलेल्या रेल्वे स्थानकाजवळील पंचशील नगर येथील रहवाशी आहे.

यावरून सदर मुलीच्या आई वडीलांचा शोध घेवून त्यानां पोलीस स्टेशनला बोलाविले व त्याचे कडे चौकशी केली असता वडीलाचे नाव भारत मधुकर कांबळे वय 33 वर्षे व आई नाम प्रियंका भारत कांबळे वय 28वर्षे रा.पंचशील नगर वाशिम ता.जि.वाशिम असे सांगितले.तसेच सदर मुली बाबत चौकशी केली असता मुलीचे नाव दिक्षा भारत कांबळे वय 03 वर्षे सांगितले व ती त्याचीच मुलगी असल्याचे सांगितले.व ती दुपारी राहते घराजवळून खेळत असताना खेळता खेळता निघुन गेली होती.त्यानंतर हेच सदर मुलीचे आई वडील असल्याची खात्री पोलीसांना झाल्यानंतर दिक्षा कांबळे हीस तिचे आई वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले.अवघ्या तीन तासात हरवलेली मुलगी परत मिळाल्याने दिक्षा कांबळे हिचे आई वडीलांनी पोलीसांचे आभार मानले.

सदर कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पुजारी व सपोनि विनोद झळके ठाणेदार वाशिम ग्रामीण याचे मार्गर्शनाखाली,सपोनि महेश मछले, पो.हे.कॉ.691/प्रकाश चव्हाण,मपोना.293/प्रमिला इंगोले,पो.कॉ.224/राजेश गांगवे यांनी केली.....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या