💥जिंतूर डॉक्टर आसोशीएशन क्रिकेट संघाने परभणीच्या बलाढ्य निमा संघावर मिळवला सात गडी राखून दिमाखदार विजय....!


💥दिमाखदार 7 गडी राखुन नेत्रदीपक विजय नोंदवत दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले💥

जिंतूर /  बी डी रामपूरकर

इंडीयन मेडीकल असोसिएशन परभणी आयोजित डॉक्टर्स क्रिकेट लिग स्पर्धा सीजन 5 च्या प्रियदर्शिनी इंदीरा गांधी स्टेडीयम  मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात जिंतूर डॉक्टर्स असोसिएशन क्रिकेट संघाने परभणीच्या बलाढ्य निमा क्रिकेट संघावर दिमाखदार 7 गडी राखुन नेत्रदीपक विजय नोंदवत दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले.                      

  जेडीए स्पार्टन संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करून परभणीच्या बलाढ्य निमा क्रिकेट संघाला दहा ओव्हर मध्ये 100 रन वर रोखले आणि फक्त 8 ओव्हर मध्येच 3 गड्याच्या मोबल्यात 101 धावा काढून तब्बल 7 गडी राखुन विजय मिळवत जे डी ए स्पार्टन क्रिकेट संघाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. 

दुसऱ्यांदा ठरली जीडीए स्पार्टन विजेता निमा संघ उपविजेता तर आय एम ए तिसरा .असोसिएशन क्रिकेट डॉक्टर किशोर घुगे सामनावीर ,बेस्ट सामनावीर बेस्ट बॅट्समन डॉक्टर गोविंद  वडपुरकर ,मालिकावीर बेस्ट बॉलर डॉक्टर गजानन जाधव.

समारोपीय कार्यक्रमात आ . डॉ राहुल पाटील यांच्या हस्ते प्रथम विजयी चषक आणि रोख 31000 ₹ कर्णधार डॉ शिवप्रसाद सानप यांना प्रदान करून  प्रत्येक खेळाडुंना सन्मानचिन्ह देऊन संघाचा गौरव करण्यात आला यावेळी सोबत डॉ अनिल कांबळे , डॉ विवेक नावंदर तसेच आयोजक  डॉ शाकीर करीम सर उपस्थित होते . 

  या विजयी संघाच्या यशाचे श्रेय संघाचे कर्णधार व यष्टीरक्षक डॉ शिवप्रसाद सानप यांनी संघाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ विक्रम परिहार आणि संघाचे उपकर्णधार डॉ अभिजीत चवंडके , डॉ शैलेश राठोड , डॉ सुनील गांजरे ,डॉ श्रीनिवास घुगे ,डॉ किशोर घुगे , डॉ रुपेश तडकसे , डॉ प्रदीप झोरे , डॉ  संतोष घुगे, डॉ गजानन जाधव , डॉ गजानन  नव्हाट , डॉ भागवत सांगळे , डॉ अविनाश चवंडके , डॉ गजानन ढाकरे ,डॉ जुनैद खान पठाण या सर्व खेळाडूंच्या अथक परिश्रमाला व संघाचे सहकारी टी एच ओ डॉ दिनेश बोराळकर , डॉ इरफान पटेल , श्री नामदेव राठोड , श्री केशव जाधव  , सर्व डॉक्टर्स तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व हितचिंतकांना दिले.    

       या सर्वोत्तम यशाबद्दल मिडियातील सर्व पत्रकार बांधव व जिंतूर डॉक्टर्स असोसिएशन आणि जेव्हीजे स्पोर्ट्स अकाँडमी व सर्व संघटनाकडून संघाचे विशेष अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या