💥जिंतूरात संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा उत्स्फूर्तपणे साजरा....!


💥शहरातून प्रगट दिन सोहळ्यानंतर भव्य दिव्य शोभायात्रा प्रमुख मार्गावरून काढण्यात आली💥

जिंतूर / बीडी रामपूरकर

जिंतूर :  चैतन्योदय गुरुकुल आश्रम येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आचार्य महेश महाराज जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा उत्स्फूर्तपणे साजरा झाला. कोरोना काळ मुळे दोन वर्षापासून धार्मिक कार्यक्रम थांबले होते परंतु आता कोरोना काळ संपल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे व  भक्तिमय वातावरण दिसून आले. शहरातील मोंढा परिसरात गुरुकुल आश्रम या ठिकाणी संत गजानन महाराज यांच्या भव्य दिव्य मंदिराची निर्मिती झाल्यानंतर अविरतपणे दरवर्षी प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. याहीवर्षी तो साजरा झाला आहे. सात दिवस  श्री रामायण कथा संपन्न झाली दररोज भजन कीर्तन पूजन पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांसह दररोज रात्री प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन संपन्न झाले तर काल्याचे किर्तन ह.भ.प माऊली महाराज मुडेकर यांचे अतिशय सुश्राव्य मार्गदर्शन लाभले.

 शहरातून प्रगट दिन सोहळ्यानंतर भव्य दिव्य शोभायात्रा प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. या शोभायात्रेत शेकडो महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या, भक्तांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होत असून महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली आहे याच प्रमाणे जिंतूर येथील गजानन महाराज नगर मध्ये गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात आला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या