💥पूर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...!


💥शहरातील शिवतिर्थावर आराध्य दैवत शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जमला जनसमुदाय💥


पूर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थावर आज शनिवार दि.१९ फेब्रुवारी रोजी जय शिवरायच्या गगनभेदी जयघोषात महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आपल्या आराध्य दैवताला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण दिवसभर शिवभक्त शिवप्रेमींनी शिवतिर्थावर हजेरी लावली.


शिवजयंती शहरातील विविध भागात भगवे पताके व ध्वज लावण्यात आले .रात्री फटाक्यांची आतिषबाजी व जन्मोत्सव साजरा करण्यात आला.शिवतीर्थ येथे फुलांची आरास व भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती.सकाळी मान्यवरांच्या उपस्थतीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी शिवतीर्थ येथे मोठी गर्दी केली होती.  महादेव मंदिर संस्थान येथे ही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नगरपालिका सभागृहात ही प्रभारी मुख्याधिकारी बोलूले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले.

 सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती चे अध्यक्ष अंकित कदम,भागवत कदम,अविनाश रेंगे,विष्णु कदम,सोनाजी शिंदे आदिनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या