💥मंगरुळपीर शहरातील ११ सराईत गुन्हेगार २ वर्षाकरीता तडीपार.....!


💥वाशिम जिल्हा पोलीस जनतेच्या सुरक्षिततेसाठी कटीबध्द💥

वाशिम (दि.२६ फेब्रुवारी) :-वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक मा.बच्चन सिंह यांनी जिल्हयातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारी आळा बसविला असुन अधिकाअधिक कारवाई करुन पोलीसांचा खाक्या नमुद आरोपीना दाखविला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील अभिलेखावरील दरोडा व जबरी चोरी चे करणा-या सागर जउळकर अधिक १० असे एकुण ११ आरोपीतांवर २ वर्षाकरीता वाशीम जिल्हयातुन तडीपार आदेश निर्गमीत केला आहे.

                   वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर शहरातील १) सागर पुरूषोत्तम जउळकर रा.माधव नगर मंगरूळपीर, २) राहूल

गजानन करवते रा.हिसई ता.मंगरूळपीर, ३) संदिप दिलीप जाधव रा.चांधई, ता.मंगरूळपीर, ४) बाळु उर्फ सुरेंद्र रामदास बुधे रा.सोनखास मंगरूळपीर, ५) सैयद नासीर सैयद जब्बार रा.अशोकनगर मंगरूळपीर, ६) अब्दुल मतीन अ.कलाम रा.अशोकनगर मंगरूळपीर, ७) सोनु उर्फ शाहरूख अहेमद खान रा.दिवानपुरा मंगरूळपीर, ८) आकाश किसन मोरे रा.प्रशिक नगर मंगरूळपीर, ९) सतिष कैलास प्रधान रा.मोहगव्हान, ता.मंगरूळपीर, १०) मुकेश निरंजन पठाडे वय २९ वर्ष

रा.अशोकनगर मंगरूळपीर, ११) सुमीत अरविंद बुधे रा.माधवनगर सोनखास मंगरूळपीर यांची मंगरुळपीर शहरात दरोडा

व जबरी चोरी या सारखे लुटमार करणारी सक्रीय टोळी असुन यांचेविरुध्द पो. स्टे. मंगरुळपीर व कारंजा शहर येथे दरोडा व जबरी चोरी या सारखे मालमत्तेचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यांच्या कृत्यावर वेळीच आळा बसावा म्हणुन त्यांच्यावर मुबंई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन सादर करण्यात आला त्या तडीपार प्रस्तावात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रावरुन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेल्या शिफारशी वरुन मा. श्री.बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हयात प्रथमच मुबई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये वरील ११ गुन्हेगारांना वाशिम जिल्हयातून दोन वर्षा करीता तडीपार करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.तसेच यापुढे ही वाशिम जिल्हयातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे गुन्हेगारांवर व ज्या गुन्हेगारांवर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे अशा गुन्हेगारांची अध्यावत यादी तयार करुन त्यावर सुध्दा लवकरात लवकर तडीपार,एम पी डी ए व मकोका कायदया अंतर्गत उच्चप्रतीची प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.मा. श्री.बच्चन सिंह, पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम जिल्हा वाशीयांना असे आवाहन केले आहे

की, वाशिम जिल्हयात गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारांवर पोलीसांचा वचक बसणे गरजेचे असुन, अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्ती गुन्हेगारांना मदत करणारे इतर गुन्हेगार यांचे वर्तनुकीत बदल न झाल्यास अशा गुन्हेगार/ टोळीवर अशाच प्रकारची प्रभावी व कठोर कारवाई करण्यता येईल, त्या अनुषंगाने वाशिम जिल्हयातील सर्व कियाशिल गुन्हेगारांवर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह वाशिम, गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांचे नेतृत्वात जनतेच्या सुरक्षिततेसाठी संपुर्ण वाशिम पोलीस कटीबध्द आहेत.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या