💥पुर्णा तालुक्यातील गौर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती उत्साहात साजरी...!


💥शिवजन्मोत्सव कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीधर पारवे यांची प्रमुख उपस्थिती💥 

💥गौर येथे सामुहीक पट्टीद्वारे निधी उभारून लवकरच उभारणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांचे स्मारक💥

-✍🏻 रामा पारवे गौर

पुर्णा (दि.२० फेब्रुवारी) - अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वा शिव जन्मोन्सव दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी तालुक्यातील गौर येथील ग्रामदैवत सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला.

गौर येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या शिव जन्मोत्सवाच्या सोहळ्यास पुर्णा पंचायत समितीचे मा.सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष श्रीधर पारवे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गावातील जेष्ठ नागरिक तथा सोमेश्वर देवस्थानचे मुख्य कारभारी सोपानकाका जोगदंड,गावचे पोलिस पाटील रामकिशन पांचाळ,अनंता पारवे,नागेश जोगदंड,सोमनाथ बोगळे,प्रदिप जोगदंड,सुनिल बोगळे,राजेश जोगदंड,रामा जोगदंड,शिवाजी जोगदंड समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती या शिव जन्मोत्सवाचे आयोजन कुंडलीक जोगदंड यांनी केले होते.


यावेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते नागेश जोगदंड म्हणाले की आपल्या गौर गावामध्ये लवकरच सामुहीक पट्टीद्वारे निधी उभारून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक तयार करण्याच्या दृष्टीने पावल उचलून सार्वजनिक स्मारक समिती स्थापण करून छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचे पुतळे आपल्या गावांमध्ये बसवण्यासाठी प्रयत्न करू ही समस्त गावकरी मंडळींची इच्छा आहे की गौर गावात दोन्ही महापुरूषांची स्मारक उभारण्यात यावी असेही यावेळी बोलतांना जोगदंड म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या