💥भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे गटात धुमश्चक्री....!

परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेच्या निवडणुकीत (बोर्डीकर-भांबळे) गट आमनेसामने....!



💥पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोठा ताफा आज रविवारी जिंतूरात दाखल💥

जिंतूर / प्रतीनिधी

परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच बोरी, चारठाणा व अन्य ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मोठा ताफा रविवारी जिंतूरात दाखल झाला आहे.

            शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे या दोघांसह समर्थकांत हाणामारी झाली असल्याची चर्चा आहे. 

         या शाळेच्या मतदान केंद्रावर जिंतूर औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सकाळपासून मतदान सुरू होते, यावेळी ज्येष्ठ नेते बोर्डीकर व माजी आमदार भांबळे हे दोन्ही गट मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून होते. यावेळी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत का आलात? म्हणून बोर्डीकर गटाच्या एकावर भांबळे यांनी आक्षेप घेतला त्यावेळी बोर्डीकर व भांबळे यांच्यात वादविवाद सुरू झाला , बाचाबाची झाली, दोघे हमरीतुमरीवर गेले, शिवीगाळ झाली, पाठोपाठ दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले, तेव्हात्याचे समर्थकही एकमेकांवर भिडले, तब्बल पंधरा मिनिटे या दोन्ही गटात मोठी धुमश्चक्री झाली. जिंतूर पोलिसांनी हस्तक्षेप करून लाठीचार्ज करत अश्रूधूर ही यावेळी  सोडून दोन्ही बाजूच्या जमावाला पांगविण्यात आले.

          याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर येथील औद्योगिक वसाहत ही सहकारी संस्थेची निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात निवडणूक लढवत असून एकूण 84 मतदार मतदान करणार आहे यासाठी मतदान प्रक्रिया जिल्हा परिषद मैदानावर सकाळी आठ वाजल्यापासून सुरू आहे.

माजी आमदार बोर्डीकर हे शासकीय विश्रामगृहात तर माजी आमदार भांबळे हे नगरपालिका कार्यालयात ठाण मांडून होते पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती हाती आली आहे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना व अन्य वरिष्ठ अधिकारी जिंतूर तात्काळ धावून आले असून अधिकारी पुढे काय कारवाई करतील या याकडे लक्ष लागले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या