💥परभणीत हैद्राबाद येथील शिख सिकलीगर समाजातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण-हत्येचा जोरदार निषेध...!


💥गुन्हेगारांना तातडीने अटक करीत कठोर शिक्षा करण्याची श्री गुरु दशमेश पिता सिकलीगर शिख विकास मंचाची मागणी💥

परभणी (दि.१८ फेब्रुवारी) : हैद्राबाद येथील शिख सिकलीगर समाजातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह सामुहिक बलात्कार व अमाणुष हत्येच्या प्रकरणात संबंधित प्रकरणातील नराधमांना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून  कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी येथील श्री गुरु दशमेश पिता सिकलीगर शिख विकास मंचाच्या एका शिष्टमंडळाने आज शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

         या मंचाचे मुख्य प्रवर्तक सरदार चंदासिंग बावरी, राजूसिंह टाक, जहांगिरसिंग बावरी, सुरजीतसिंह भोंड, झेलसिंग बावरी, बिभनसिंग बावरी,रकबीरसिंग टाक,रघुवीरसिंग टाक,एजीसिंग टाक, किसनसिंग टाक, तुफानसिंग टाक, हरमोहनसिंग टाक,हिरासिंग टाक, युवराजसिंग टाक,ज्वालासिंग टाक, ईश्‍वरसिंग टाक,अर्जूनसिंग टाक, विजयसिंग जून्नी आदींनी जिल्हा प्रशासनास तसेच आमदार डॉ. राहुल पाटील यांना निवेदन सादर करीत हैद्राबादच्या त्या घटनेचा प्रखर शब्दात निषेध व्यक्त केला १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर त्या निष्पाप मुलीवर शैतानी प्रवृत्तीच्या नराधमांकडून अमानुषपणे सामुहिक बलात्कार करण्यात आला व या घटने नंतर त्या मुलीची अमानुषपणे हत्याही करण्यात आली. तीच्या मृतदेहावरील खूणा अत्याचाराच्या घटना स्पष्ट करीत असून त्यामुळे या प्रकरणात सरकारने तेलंगणा पोलिसांवर दबाव आणून त्या गुन्हेगारांविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

महानगर पालिका नगरसेवक सुशिल कांबळे यांच्याद्वारेही निषेध ;-

        महापालिकेचे सदस्य सुशील मानखेडकर-कांबळे यांच्यासह एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना या आशयासंदर्भातच शुक्रवारी एक निवेदन सादर केले. त्याद्वारे आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सुशील कांबळे, राम टाक, पुनमसिंग टाक, स्वरणसिंग टाक, गोलासिंग टाक, प्रेमसिंग दुधानी, किरणसिंग जून्नी, करतारसिंग टाक, बसंतसिंग टाक, भोलासिंग जून्नी, बलबिरसिंग जून्नी आदींनी या निवेदनातून त्या कुटूंबियांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या