💥जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या मंगरूळ तांडा येथे आगीत सहा घरे जळून खाक....!


💥शेळ्यांसह संसारोपयोगी वस्तू ची झाली राख💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या मंगरूळ तांडा येथे आगीत सहा घरे जळून खाक झाल्याची घटना दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली या आगीमध्ये सहा घरातील संसारोपयोगी वस्तू व तसेच शेळ्यांची पिल्ले जळून मृत्यू पावले आहे.

ही आग कशामुळे लागली नेमकं कळाले नाही परंतु शॉर्टसर्किटने झाल्याची चर्चा या तंडा परिसरात आहे मंगरूळ तांडा येथे आगीच्या घटनेमध्ये गोविंद रामदास आडे, विजय गोविंद आडे, राजू गोविंद आडे भुजंग बाबुराव चव्हाण, गजानन भुजंग चव्हाण शेषेराव शिवाजी राठोड यांच्या घराला अचानक आग लागली होती या आगीने बघता बघता घराच्या चौही बाजूने पेट घेतल्याने घरामधील गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ तसेच शेळींचे पिल्ले व नगद वीस हजार रुपयांसह संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले. अंदाजे या सहा कुटुंबाचा जवळपास नऊ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे मंगरूळ तांडा येथील महिला व नागरिकांनी आजूबाजूच्या विहिरीतून व घरातील पाण्याच्या टाकीतून पाणी आणून आग विझवून आटोक्यात आणली या आगीच्या घटनेची माहिती जिंतूरचे तहसीलदार सखाराम मांडवगडे तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आली महसूल विभागातील तलाठी होळ यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच या आगीची माहिती लागताच जिंतूर सेलू मतदार संघाचे आमदार सौ.मेघना बोर्डीकर यांनीही घटनास्थळी भेट दीली.

मंगरूळ तांडा येथील सहा घरांना आग लागून पूर्णपणे जळून खाक झाल्याने येथील  सहा कुटुंब उघड्यावर आल्याचे दिसत आहे या कुटुंबांना प्रशासनाने जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या