💥जिंतूरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्व संध्येला दिपोत्सव...!


💥जिजाऊ ब्रिगेडचा अभिमानास्पद उपक्रम💥 

जिंतूर / बी.डी.रामपूरकर,जिंतूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शहरातील पुतळा परिसरात दिवे लावण्यात आले यामुळे पुतळा परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता.


छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात विविध उपक्रमांनी 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते याचेच औचित्य साधून शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला पुतळा परिसरात लक्ष दिवे लावण्यात आले यामुळे पुतळा परिसर दिव्यांच्या प्रकाशामुळे उजळून निघाला होता यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा रंजना भोंबे,शालिनीताई देशमुख,प्रतिभा साबळे,मिना भोंबे,नमिता सोळंके,मेघा मस्के,शिवनंदा शिंदे,अश्विनी मेटांगळे,जानकी कदम आदी भगिनींची प्रामुख्याने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या