💥हिंदु धर्माचा त्याग करून हाटकर समाज च्या युवकाने बोध्द धम्माचे चिवर घातले अंगावर...!


💥पिराजी कड यांनी हिंदु धर्माचा त्याग करून बोध्द धम्माची दिक्षा भदंत पय्यरत्न थेरोंच्या प्रमुख उपस्थितीत ग्रहण केली💥 

पूर्णा (दि.२० फेब्रुवारी) - हिंगोली जिल्ह्यातील हाटकर समाजाच्या उच्च शिक्षित तरुण पिराजी हैबती कड यांनी हिंदु धर्माचा त्याग करून बोध्द धम्माची दिक्षा भदंत पय्यरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रहण केली 

हिंदु धर्म मनुसमृतीच्या अनिस्ट रूढी अंधश्रद्धेवर असल्याने पिराजी कड यांनी महाविद्यालयीन शिक्षण काळात डॉ नरेंद्र दाबोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचारावर मोठा प्रभाव पडल्याने त्यांना हिंदू धर्मातील रूढी परमपरा अंधश्रध्दा कल्पनिकता नकोशी झाली त्यामुळे त्यांनी बायबलचा अभ्यास केला कुराणचा अभ्यास केला पण तिथेही काल्पनिकता इश्वर असल्याने तिही मोठी अंधश्रध्दा दिसून आली पिराजी कड यांचं बिएससी,एमएससी,डिईडी मुक्त विद्यापीठा कडून बिए ची पदवी तथा अग्रीकल्चरचा डिप्लोमा त्यांनी केला त्यांना चमत्कार ईश्वर मान्य नसल्याने अखेर त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकराचे अनेक पुस्तके वाचली

त्यात त्यांना 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ फारच आवडला व त्यांनी बौद्ध धम्मात जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी ९ सप्टेंबर २०१६ पासून भन्ते पय्यारत्न थेरो यांच्या सहवासात वेळ द्यायला सुरुवात केली त्यांचा उपासक दिक्षांत सोहळा १ जानेवारी २०१८ ला नांदेड येथे झाला व त्यांनी  २५ जानेवारी २०२२ ला चिवर ग्रहण केले त्याच क्षणापासून पिराजी हेबती कड यांचा भन्ते पय्याकीर्ती असे नामकरण झाले त्यांच्या या धम्म दिक्षेला त्यांच्या आई ,वडील यांच्या संमतीने झाला असून त्याच्या या धम्मदीक्षे नंतर त्यांच्यावर काही प्रसंग आल्यास भन्ते पय्याकीर्ती यांना संपुर्ण संरक्षण व आधार देऊन त्यांना सांभाळण्यासाठी पूर्णेतील समाज समर्थ आहे तसेच बौद्ध कालीन साहित्य पुरविण्यास आपण तयार आहोत असे अभिवचन भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले त्यांचा बौध्दिसत्व डॉ बी आर आंबेडकर स्मारक समिती व बुद्ध विहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी नगर परिषदेचे मा.उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उत्तम खंदारे,रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाश कांबळे,नगरसेवक धम्मानंद जोंधळे,नगरसेवक मोकिंद भोळे,नगरसेवक ॲड.धम्मानंद जोंधळे,नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या