💥युक्रेन देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा...!


💥हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन💥

हिंगोली : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशामध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता आहे.

अशा नागरिकांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली, फोन - टोलफ्री : 1800118797, दूरध्वनी क्र. 011-23012113/ 011 23014105 / 011 23017905, फॅक्स क्र. 011 23088124, ई-मेल : situationroom@mea.gov.in ही हेल्पलाईन नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी भ्रमणध्वनी क्र. 9552932981 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या