💥पुर्णा तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत मोहम्मद उमर मोहम्मद आसिफ या विद्यार्थ्याने पटकावला प्रथम क्रमांक....!


💥प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मोहम्मद उमरचे गटशिक्षणाधिकारी कापसीकर अभिनव विहारचे आनंद अजमेरा यांनी केले कौतुक💥 

 आज शनिवार रोजी जिल्हा परिषद परभणी तर्फे अभिनव विद्या विहार येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलच्या मोहम्मद उमर मोहंमद आसिफ या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी कापसीकर साहेब, अभिनव विहारचे आनंदजी अजमेरा  उपस्थित होते. विद्यार्थ्यास दिनेश श्रीलेले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

 या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अतिया बेगम, संस्था अध्यक्ष डॉक्टर वाघमारे सर, संस्थेचे सचिव श्रीनिवास काबरा सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या