💥परभणी जिल्ह्यातील पाथरीत रांगोळीतून साकारली आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा....!


💥रांगोळी कलाकार ज्ञानेश्वर बर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल १७ क्विंटल रांगोळी पासून साकारली शिवरायांची प्रतिमा💥

किरण घुंबरे पाटील

परभणी (दि.१८ फेब्रुवारी) - जिल्ह्यातील  पाथरी शहरातील ज्ञानेश्वर नगर देवनांद्रा भागातील देवनांद्रा शाळेच्या प्रांगणानात पाथरी तील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने दहा हजार तीनशे ब्यानव स्वेअर फुट आकाराची भव्य अशी छत्रपती शिवरायांची रांगोळी प्रतिमा उभारुन छत्रपतींना अभिवादन केले आहे. रांगोळी कलाकार ज्ञानेश्वर बर्वे आणि त्यांच्या सहका-यांनी तब्बल १७ क्विंटल रांगोळी पासून ही छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. या प्रतीमेला पाहुन अभिवादन करण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ही प्रतिमा तयार करण्यास ज्ञानेश्वर बर्वे आणि त्यांच्या सहका-यांना तब्बत सतरा तास लागले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या