💥सामान्य ग्राहक हाच चिखली अर्बन बँकेचा पाया आहे -- सतीशभाऊ गुप्त

 

💥चिखली अर्बन बँकेच्या शिवणी शाखेच्या ६ वर्धापन दिन ; १३ महिलां बचत गटांना ६७ लाख २० हजार रुपयांचे वाटप💥       

✍️ मोहन चौकेकर                                                     

चिखली : सामान्य ग्राहक हाच चिखली अर्बन बँकेचा पाया असल्याचे प्रतिपादन चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशभाऊ गुप्त यांनी   दि .चिखली अर्बन को-ऑप बँक ली चिखलीच्या शिवणी अकोला शाखेचा सहावा वर्धापन दिनानिमित्त आयोजित महिलांच्या बचतगटांच्या कर्ज वाटप प्रसंगी बोलताना केले. या वेळी  बोलताना बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष व चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशभाऊ गुप्त पुढे म्हणाले सामान्य ग्राहकांच्या हितासाठी चिखली अर्बन बँकेने डायमंड ज्यूबली ठेव  धमाका हि ठेव योजना जाहीर केली असुन याद्वारे ९१ दिवसांसाठी ७.५० टक्के व १८१ दिवसांसाठी ८. ०० असा व्याजदर दिला जातो आहे. 


महाराष्ट्रातील कोणतीच बॅक एवढा मोठा व्याज दर देत नाही . मात्र चिखली अर्बन बँके एवढा मोठा व्याजदर यामुळे देऊ शकते की चिखली अर्बन बँकेने बचत गटांद्वारे  ३८  हजार महिलांना साधारणपणे १०० कोटी रुपयांचे  कर्ज वाटप केले आहे . महिला गटातील सर्व महिला प्रामाणिकपणे या कर्जाची परतफेड करत आहे . या सर्व ३८ हजार महिला या कर्जाची परतफेड नियमितपणे करत असल्याने चिखली अर्बन बँकेचा नफा जास्तीत जास्त वाढत आहे. तसेच   चिखली अर्बन बँकेने व्यापारी व इतर ग्राहकांना दिलेल्या कर्जाची देखील वसुली चांगली असल्याने चिखली अर्बन बँक  नफा दिवसोदिवस वाढतच आहे त्यामुळे चिखली अर्बन बँक डायमंड ज्यूबली ठेव धमाका ठेव योजनेमध्ये चिखली अर्बन बँक ठेवीदारांना , ग्राहकांना ९१ दिवसांसाठी ७.५० व १८१ दिवसांसाठी ८. व्याजदर देऊ शकत आहे. इतक्या कमी कालावधीत एवढा मोठा व्याजदर देणारी    चिखली अर्बन बँक ही भारतातील एकमेव बॅक आहे.  केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार  CGTMSE अंतर्गत कर्ज देण्यास सर्व राष्ट्रियकृत बॅंका आणि 2019 पासून फक्त शेड्युल बँका पात्र होत्या. CGTMSE  मध्ये नाॅन शेड्युल अर्बन बँक को ऑपरेटीव बॅंक , राज्य सरकारी बॅंक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश व्हावा अशी  मागणी महाराष्ट्र राज्य अर्बन बँक्स फेडरेशन लि.चे अध्यक्ष मा. विद्याधरजी अनासकर व  चिखली अर्बन बँकचे  अध्यक्ष मा.सतीशभाऊ गुप्त व  सहकार भारती यांनी  केंद्रीय वित्त मंत्री सौ निर्मला सितारामन व सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या कडे केली होती.   मा.विद्याधरजी अनासकर व  मा सतीशभाऊ गुप्त व सहकार भारती यांनी गेल्या पाच वर्षांपासून सतत   या मागणीसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री मा.नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तत्कालीन वित्त मंत्री अरुण जेटली असल्यापासून  प्रयत्न केले होते. व त्यानंतर विद्यमान वित्त मंत्री सौ निर्मला सितारामन यांच्याकडेही या मागणीसाठी सतत पाठपुरावा केला होता व ही मागणी लावून धरली होती.त्यानुसार   ही मागणी मंजूर झाल्याचे या वेळी बोलताना सांगितले.  चिखली अर्बन बँकेने हिरक महोत्सवाच्या निमित्ताने नव उद्योगासाठी  ३१ आक्टोंबर२०२१ रोजी   चिखली येथे  उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण  शिबीर आयोजित केले होते.या शिबीराचे उद्घाटन केंद्रीय सुक्ष्म, लघु,व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले होते.या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना  चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त  यांनी  उद्योग मंत्रालयाच्या विविध योजना   कार्यान्वित करण्यासाठी नागरी सहकारी बँकाचा CGTMSE   मध्ये समावेश करावा असे म्हटले  होते. तसेच चिखली अर्बन बँकेने महीला बचत गटांच्या माध्यमातून ३८ हजार महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले होते आजमितीस केवळ सरकारी बॅंकानाच उद्योजकांना आर्थिक पुरवठा करण्याचे अधिकार असुन हे अधिकार नागरी सहकारी बँकांना दिल्यास महाराष्ट्रात अधिकाधिक उद्योजक तयार  होऊन जिल्ह्याच्या विकासास चालना मिळेल असे त्यांनी या बोलताना मत व्यक्त  केले होते. या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना केंद्रीय सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी   मा सतीशभाऊ गुप्त यांच्या या  मागणीची दखल घेत  CGTMSE मध्ये नाॅन शेड्युल अर्बन बँक को ऑपरेटीव बॅंक , राज्य सरकारी बॅंक  व जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश करण्यासाठी मी  निश्चित प्रयत्न करेल असे  म्हटले होते.  अवघ्या काही दिवसांतच ही मागणी सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे पूर्ण केली व त्यानुसार त्यांनी दिलेला  शब्द पाळला असुन CGTMSE  योजनेमध्ये या सर्व बॅकाचा समावेश करण्याचा निर्णय भारत सरकारच्या सुक्ष्य, लघु व मध्यम मंत्रालयातर्फे घेण्यात आला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. ही मागणी मंजूर करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मदत करणाऱ्या केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री मा . नितिनजी गडकरी व वित्त मंत्री सौ निर्मला सितारामन तसेच ही मागणी मंजूर करून केंद्रीय सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे आभार मानले व सुक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिखली अर्बन बँकेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित उद्योगकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबीरात दिलेला शब्द पाळला असल्याचे त्यांनी सांगितले.

CGTMSE मध्ये सुक्ष्म व लघू उद्योगांना रु.2 कोटीपर्यंत विना तारण कर्ज मिळू शकते. या कर्जासाठी बॅंकेचा प्रचलीत व्याजदरा शिवाय या योजनेअंतर्गत कर्ज रकमेवर १.५% ते ३% पर्यंत  गॅरंटी फी आकारली जाते.  अशी योजना सुक्ष्म आणि लघु उद्योजकांना वित्त पुरवठा करण्यासाठी सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि लघु उद्योग विकास बँक यांनी एकत्र येऊन क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो इंटरप्राइजेस या न्यासाची स्थापना केली. सूक्ष्म  व लघु उद्योगांना तारण राहणे हेच या न्यासाचे मुख्य काम आहे.

 आता उद्योजकांना विना तारण 2 कोटीपर्यंत कर्ज  सहकारी बँकेतून घेता येईल अशी माहिती या वेळी दिली. दि .चिखली अर्बन को-ऑप बँक ली चिखली च्या शिवणी अकोला शाखेचा सहावा वर्धापन दिनानिमित्त चिखली बँकेचे अध्यक्ष व बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष असलेले  सतीशजी गुप्त यांच्या व उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे सर पालक संचालक मनोहर खडके सर व  अकोला महानगराचे  पर्यावरण गतिविधि संयोजक भुषणजी बापट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  अकोला महानगर पर्यावरण गतीविधी संयोजक भुषणजी बापट  यांनी पर्यावरण गतीविधी या विषयावर उपस्थित महिलांना अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले.  यावेळी बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग करत असणाऱ्या १३ महीला बचत गटातील १९२ महिलानां ६७,२०००० रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या वेळी  चिखली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष मा पुरुषोत्तम दिवटे सर यांनी  २००८ सारी १०० महिलांना प्रत्येकी १० हजारांचे कर्ज वाटप करुन बचत गटाची सुरुवात झाल्याचे सांगितले व आज घडीला महिलांना प्रत्येकी एक एक लाखापर्यंत कर्ज देण्यात येत असुन आतापर्यंत ३८००० महिलांना कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती दिली.  या वेळी पालक संचालक  मनोहर खडके यांनी सहा वर्षांपूर्वी  सुरू करण्यात शिवणी अकोला शाखेच्या आज रोजी ठेवी २२ कोटी ६५ लाखापर्यंत असल्याचे सांगितले.   यावेळी स्थानिक सल्लागार जयप्रकाश पाटील, सुरजितसिंग सेठी, मोहन खाकरे, सत्यनारायण झंवर शाखाधिकारी सचिन मोहिते व कर्मचारी वर्ग यांच्यासह बचत गट प्रतिनिधी गोपाल दिवटे , किरण बांगर , सौ रेखा विश्वकर्मा  उपस्थित होते . महिला बचत गटांच्या कर्ज वाटप मेळाव्यानंतर पसायदाने कार्यक्रमाची सांगता झाली.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या