💥पुर्णा तालुक्यातील सोनखेड व रुपला पांढरी गावांना प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी दिल्या भेटी..!


💥गावातील दिव्यांगांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन शासनाने दिव्यांगासाठी लागू केलेल्या विविध शासकीय योजनांची दिली माहिती💥

पुर्णा (दि.२४ फेब्रुवारी) - तालुक्यातील सोनखेड व रुपला पांढरी येथील दिव्यांगाना आज गुरूवार दि.२४ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांनी भेट देवून दिव्यांगांसाठी शासनाने लागू केलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.


यावेळी मदनकुमार भोसले,सुरेश वाघमारे ,मचक कुऱ्हे,शिध्दु आगलावे व रुपला व सोनखेड येथील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दिव्यांगांशी बोलतांना तालुका प्रमुख सोनटके म्हणाले की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडी अड़चनी असल्यास माझ्याशी संपर्क साधा तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल प्रहार जनशक्ती पक्षाची ताकत तुमच्या सोबत आहे व येत्या काळात बच्चु भाऊ यांचा मोठा मेळावा घेऊ व संर्वाचे कामे करून देऊत असेही ते म्हणाले... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या