💥राज्यातील प्रभाग रचना लवकरच होणार ; निवडणूक आयोगाची घोषणा....!


💥त्यानुसार आता १० मार्च रोजी प्रारुप तर १ एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश💥

मुंबई ; राज्यातील नगरपालिका निवडणूकांच्या तयारीने आता वेग घेतल्याचे निदर्शनास येत असून राज्यातील नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमा अनुसार आता येत्या १० मार्च २०२२ रोजी प्रारुप तर १ एप्रिल २०२२ रोजी अंतिम प्रभागरचना जाहिर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.त्यामुळे नगरपालिका निवडणूक आता एप्रिल नंतरच होणे अपेक्षित आहे राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपालिकांच्या प्रभागरचनेचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे २ मार्चला पाठवायचा असून त्याची प्रसिद्धी १० मार्च रोजी करावयाची आहे. त्यावर हरकती मागवून १ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना जाहिर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत...

पुर्णा नगर परिषदेतील प्रस्थापितांनी भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरून केली स्वतःच्या सोई अनुसार प्रभाग रचना ?

पुर्णा नगर परिषदेत मागील अनेक वर्षापासून अधिराज्य गाजवणाऱ्या प्रस्थापितांनी नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून स्वतःच्या सोईनुसार प्रभाग रचना करून पाठवल्यामुळे सदरील प्रभाग रचनेला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली नसल्याचे वृत्त हाती आले असून पुन्हा नव्याने सुधारीत प्रभाग रचना करून पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्याचे समजते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या