💥पूर्णेत मान्यवरांच्या हस्ते दासोह शिष्यवृत्ती सोहळा संपन्न....!


💥या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी शुभम शिवराज बिबेकर यांचा ही सत्कार करण्यात आला💥

पूर्णा (दि.२१ फेब्रुवारी) - शहरातील ग्रामदैवत श्री गुरुबुद्धिस्वामी मठसंस्थान येथे गुरुबुद्धिस्वामी सेवा समिती तर्फे दरवर्षी शिष्यवृत्तीचे वितरण लिंगायत समाजातील गरजू विद्यार्थ्यांना केले जाते गेले काही वर्षे कोरोना साथीच्या प्रभावामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता यावर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला आहे.

दरम्यान या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी शुभम शिवराज बिबेकर याने गणित या विषयात सेट परीक्षा भरघोस गुणांनी यश प्राप्त केल्याबद्दल, व्यासपीठावर उपस्थित शिवसेना युवा नेते संतोष एकलारे,विद्या प्रसारिणी शाळेचे मुख्याध्यापक शिवदर्शन हिंगणे,प्रकाश कापसे,गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयचे कार्यध्यक्ष प्रमोद एकलारे,स्वा सै पवार महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कुर्हे,रमेश अण्णा एकलारे,चित्रकार अशोक नागठाणेनागनाथ बिबेकर आदी मान्यवरांच्या तसेच असंख्य समजबांधवांच्या उपस्तिथीत भव्य सत्कार करण्यात आला तसेच समाजातील गरजू गुणवंतांना दासोह शिष्यव्रुत्तीचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी वैष्णवी नागठाणे,संजना नागठाणे,रिद्धी नागठाणे,ऋषिकेश सोळंके,त्रिपुर भालेराव,प्रत्युश कुर्हे,मानसी पंढरपुरे, मारुती पत्रे,चंद्रशेखर बोगळे,सायली कुर्हे,यश वळसे,श्रेयशा भालेराव तर नोकरी धारक म्हणून प्रिती एकलारे,नितीन सोनटक्के,भास्कर बेडके यांचा तर शिष्यवृत्ती धारक म्हणून शुभम नरखेडे, निकिता भालेराव,पवन हुस्से तसेच पदोन्नती झालेले विद्या प्रसारिणी शाळेचे मुख्याध्यापक तथा साहित्यिक शिवदर्शन हिंगणे तसेच संतोष मुर्गे यांचाही सत्कार यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या