💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील शेतकऱ्याचा एक एकर ऊस जळून मोठे नुकसान...!


💥महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान💥

पुर्णा (दि.२६ फेब्रुवारी) - तालुक्यातील धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील गट नंबर चार मधील एक एकर ऊस विजेच्या तारा घर्षण होऊन सायंकाळी पाचच्या सुमारास काही क्षणात  जळून खाक झाला आहे यामुळे येथील शेतकरी नामदेव हरिभाऊ खोंडे यांचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून महावितरण कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

 धानोरा  काळे गाव गोदावरी नदीवर वसलेले असून दिग्रस बंधाऱ्यावर पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्याने ऊस पिकाची लागवड केली होती खोंडे यांनी वर्षभर मेहनत घेत कीड रोग,पाणी व्यवस्थापन,संगोपन यावर मोठा खर्च  केला होता यातून वर्षभराचे आर्थिक नियोजन केले परंतु   परिसरातील साखर कारखान्याकडून वेळेवर उसाची तोडणी झाली नाही त्यातच काल महावितरण कंपनीच्या विजेच्या तारा घर्षण होऊन उभा ऊस जळून खाक झाला यामुळे  शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले असून अदीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.तात्काळ महावितरण कंपनीने झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नामदेव खोंडे यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या