💥प्रहार जनशकी पक्षाच्या पाठपुराव्याला यश ; मुळी बंधाऱ्यावरील गेट बसविण्याचा मार्ग मोकळा...!


💥दोन हजार हेक्टर जमीन बारमाही सिंचनाखाली येणार💥

परभणी (दि.२६ फेब्रुवारी) - गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्यावरील गेट बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असून या विषयी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बांधने यांनी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडू यांच्याकडे मुळी बंधाऱ्यावर जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत गेट बसविण्यासंदर्भात पत्र दिले होते. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने या आधी जायकवाडी, विष्णुपुरी, माजलगाव, निम्नदुधना, इसापूर प्रकल्प, पैठण डावा व उलवा कालवा या प्रकल्पावर गेट बसविण्याचे दर्जेदार काम केलेले आहे. 


या संदर्भात शिवलिंग बोधने यांनी जलसंपदा विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता दि. २६ ऑक्टोंबर २०२२ राजी मा.ना. बच्चुभाऊ कडु जलसंपदा राज्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार अभियांत्रिकी मंडळ, नांदेड यांनी या कामाची २४ कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मंजुरी तयार करून जलसंपदा विभागास पाठविण्याच्या सूचना यांत्रिकी विभागास केल्या होत्या. त्यानुसार सुधारीत प्रशासकीय मंजुरी प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला असून प्रस्ताव मंजूर होण्याच्या शेवटच्या टप्यात आहे. या कामाला यापूर्वी १६ कोटीची प्रशासयको मंजुरी आहे  त्या आधारावर एप्रिल २०२२ ला मुळी बंधाऱ्यावरील गेट बसविण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती मा.ना. बच्चुभाऊ कडु जलसंपदा राज्यमंत्री यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

 दि. २० जानेवारी २०१२ रोजी जलसंपदा यांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता श्री. मिलिंद जीवने साहेब व श्री. वानखेडे साहेब, अधीक्षक अभियंता यांत्रिकी विभाग नांदेड यांनी मुळी बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी सोबत उपस्थित होते.

 मुळी बंधाऱ्याची पाणी साठवणुक क्षमता १०.३५ दलघमी इतकी आहे परंतु २०१२ मध्ये बंधाऱ्याचे गेट वाहून गेले होते त्यानंतर खाजगी एजन्सीमार्फत २०१६ मध्ये वाहून गेलेले २० गेट बसविण्यात आले होते. त्यापैकी १६ गेट पुरामध्ये वाहून गेल्याने बंधाऱ्यात क्षमतेने पाणी साठा होत नाही. सततचा राजकीय हस्तक्षेप व खाजगी कंत्राटदाराकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम यामुळे मुळी बंधाऱ्यावरील गेट बसविकेले गेट वाहून गेले. या बंधाऱ्यावर दर्जेदार व मजबूत काम होणे आवश्यक असल्याने संबंधित काम जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडूनच करावे व यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रहार जनशी पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मा.ना. बच्चूभाऊ कडू यांच्या कडे करण्यात आली होती.

या बंधाऱ्यावर गेट बसविल्यानंतर परिसरातील ११ गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून परिसरातील दोन हजार हेक्टर जमीन बारमाही सिंचनाखाली येऊ शकते. या सर्व बाबीचा विचार करून  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी या कामाबाबत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून अधिक्षक अभियंता यांत्रिकी विभाग नांदेड यांच्यामार्फत मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून एप्रिल २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या