💥जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी....!


💥आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले💥      

जिंतूर/ बी.डी. रामपूरकर      

जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शासनाने घोषीत केल्याप्रमाणे रविवार 20 फेब्रुवारी रोजी पत्रकार भवनमध्ये दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

                   मराठी वृत्तपत्र सृष्टीचे आद्यप्रवर्तक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दरवर्षी 06 जानेवारी रोजी दर्पणदिन म्हणून साजरी करण्यात येते. मात्र 06 जानेवारी रोजी ऐवजी 20 फेब्रुवारी रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात यावी असे शासनाने जाहीर केले आहे. म्हणून शासनाने घोषीत केल्याप्रमाणे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनात पदाधिकारी व सदस्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम. ए. माजीद,  अध्यक्ष शहेजाद खान, सचिव रामप्रसाद कंठाळे, सिराजोद्दीन सिद्दीकी, शेख अलीम, एम एजाज आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या