💥काळ्या बाजारात जाणारा राशनचा ट्रक पोलिसांनी पकडला ; कारंजा तालुक्यातील घटना...!


💥प्रकरणात ट्रक किमत १२ लाख रूपये व ५ लाख रुपयांचा माल असा एकुन १७ लाख रूपयाचा मुद्येमाल जप्त💥 

वाशिम :- जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशन  ग्रामिणचे पोलिस पथक दि.२५ फेब्रुवारी २०२२ रोजी हद्दीत पेट्रोलींगवर असताना माहिती मिळाली की, एक ट्रक कं. एम.एच. ३४ एम ८३१३ हा सरकारी रेशनींगचा तांदुळ काळा बाजार करणे हेतुने अवैद्य विक्रीसाठी वाशिम जिल्हयातुन चंद्रपुर येथे जात आहे.अश्या माहितीवरून कारंजा ते शेलुबाजार रोड येथे तपोवन फाटा या ठिकाणी निगराणी करून सदरचा ट्रक पकडुन वाहन चालक यास चौकशी केली असता त्यांने आपले नाव जुबेरोद्दीन फहीमौद्दीन रा. दलपतपुर जि. फतेपुर उत्तरप्रदेश असे सांगीतले, त्यास ट्क मधील माला बाबत विचारणा केली असता तांदुळ घेवुन जात असल्या बाबत सांगीतले.

वाहन चालकाकडे मालाचे बिल व वाहतुक परवाना मागीतला असता मिळुन आला नाही.वरून सदरचा ट्क पो.स्टे.ला आणुन ट्कमधील मालाची पाहणी केली असता त्यामध्ये सरकारी रेशनींगचा तांदुळाचे प्रत्येकी ५० किलो वजनाचे जवळपास ५०० कट्टे अंदाजे किमंत ५,००,000/- (पाच लाख) रूपयाचा माल आढळुन आला वरून पंचनामा करून ट्क डिटेन करण्यात आला. ट्क मधील तांदुळाचा माल हा सरकारी रेशनींगचा असल्याची खात्री करण्यासाठी तहसीलदार कारंजा यांना पत्र देवुन पुरवठा निरीक्षक यांच्या मार्फतीने तपासनी करण्यात येवुन त्यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर संबंधीत वाहन चालक, धान्याचे मालक सलमान व वाहन मालक याचे विरूध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियम सन १९५५ चे कलम ३,७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे, प्रकरणात ट्क किमती १२ लाख रू.व ५ लाख रू.चा माल असा एकुन १७ लाख रूपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास कारंजा ग्रामिण पोलीस करीत आहे.सदरची कार्यवाही मा. बच्चनसिंग पोलीस अधिक्षक वाशिम , श्री. गोरख भामरे अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. जगदिश पांडे उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा यांच्या मार्गदर्शनात पो.नि. गजानन धंदर यांचे नेतृत्वात सफौ धनराज पवार, पोहेकॉ महेद्रसिंग रजोदिया, संतोष राठोड, पोकॉ संतोष राठोड व फिरोज भुरीवाले यांनी केली आहे.

पोलिसविभागाकडुन नागरीकांना आवाहन करण्यात आले की, धान्याची काळाबाजारी होत असेल तर वरीष्ठ पोलीस अधिकारी किवा पोलीस नियत्रंन कक्ष यांना माहिती द्यावी ,आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.....

प्रतीनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या