💥आयकाॅनिक सप्ताहांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केली कामांची पाहणी...!


💥सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनच्या कामांना गती💥

फुलचंद भगत

वाशीम:शासनाच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 या कार्यक्रमांतर्गत  मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी काल गुरुवार दि.10 फेब्रुवारी रोजी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनच्या कामांची पाहणी केली.


ग्रामिण भागातील प्रत्येक कुंटुबांला नळाव्दारे शुध्द व शाश्वत पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी तसेच ग्रामीण भागात स्वच्छता चळवळ गतिमान होण्यासाठी जिल्हयात आयकॉनिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील चकवा, शिवणी रोड, कुंभी आणी कासोळा या गावातील वैयक्तिक शोषखड्डे (मॅजिकपिट), नाडेफ- खतखड्डा या कामांना सुरुवात झाली असुन त्या कामांना गती यावी व सदर कामे ही गुणवत्तापूर्ण व्हावी या हेतुने सीईओ वसुमना पंत यांनी कामांची पाहणी केली. यावेळी मंगरुळपर गट विकास अधिकारी सुरेश कांबळे, परिविक्षाधिन अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, जिल्हा परिषदेचे राम श्रृंगारे, विस्तार अधिकारी  भाऊराव बेलखेडकर, माहुलकर, , शाखा अभियंता महेश कान्हेरकर, बिआरसी प्रविण आखाडे यांची उपस्थिती होती. 

शासनाच्या महत्वांक्षी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 या कार्यक्रमांतर्गत ग्रामिण भागातील प्रत्येक कुंटुबांला नळाव्दारे शुध्द व शाश्वत पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी तसेच ग्रामीण भागात स्वच्छता चळवळ गतिमान होण्यासाठी आयकॉनिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहातील उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी केले होते. जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 ची प्रभावी अंमलबजावणी व गती वाढविण्यासाठी जिल्ह्यात आयकॉनिक सप्ताह राबविण्याबाबतचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत. या सप्ताहामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 100% नळजोडणी झालेल्या गावांमध्ये हर घर जल घोषित ग्रामसभेचा ठराव प्रमाणपत्र, व्हिडीओ क्लिप संकेतस्थळावर नोंदविणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व स्वच्छ पर्यावरण तसेच सुदृढ आरोग्य आणि शुद्ध पिण्याचे पाणी या विषयावर निबंध स्पर्धांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करणे, ग्रे वॉटर  व्यवस्थापनाबाबत गावांमध्ये भित्ती- चित्र रेखाटने, पाणी आणि स्वच्छता या विषयावर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची बैठक आयोजित करणे, सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता ही श्रमदानाच्या माध्यमातून करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांच्या नोंदी संकेतस्थळावर अद्यावत करणे आदी उपक्रम राबवले जात आहेत. 

घरकुलाच्या जागा खरेदीसाठी रु 50 हजाराचे अनुदान :-

जिल्यासंतील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजनेतुन घरकुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान कुंभी (ता. मंगरुळपीर) येथील घरकुलाच्या कामाची पाहणी केली असता लाभार्थ्याकडे घरकुलासाठी अपुरी जागा असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी सीईओ पंत यांनी गटविकास  अधिकारी व ग्रामसेवक यांना शासनाच्या पंडित दिन दयाल उपाध्याय योजनेतुन घरकुलाकरीता जागा खरेदी साठी रु. 50 हजाराचे अनुदानमिळत असल्याची माहिती दिली. ग्रामसेवक व लाभार्थी दोघेही  या योजनेच्या  माहितीपासुन अनभिज्ञ असल्याचे सीईओ पंत यांच्यानिदर्शनास आल्यावर सर्व गावांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या