💥जिंतूर येथे कर्नाटक राज्यातील सिमेगा येथील हत्येचा विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून निषेध....!


💥पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया,कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी💥 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर : कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्षा नामक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्त आहे. असे विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने (दि.२४) गुरुवार रोजी तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.

        हि हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेला नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्याक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे. अशी आमची स्पष्ट धारणा आहे. पापुलर फ्रंट ऑफ इंडिया कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरवण्याचे जे कार्य सुरु केलेले आहे त्याचा परिणाम हि हत्या आहे.

भारतात घडलेल्या १९४७ च्या डायरेक्ट अक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जबर बसावी अशी शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदू परिषद ने या निवेदनाद्वारे मागणी केली आहे सिमीचे दुसरे रूप असलेल्या पापुलर फ्रंट ऑफ इंडिया या सारख्या संघटनावर व त्यांचा नेतृत्वावर बंदी घालावी आणि त्याचा पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वाटणीवर आणण्यासाठी सक्षम आहे व पापुलर फ्रंट ऑफ इंडिया कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमोक्रेटिक पार्टी या संघटनेचे पायमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेली त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संपूर्ण सनातन हिंदू समाज कायदेशीर व संवैधानिक मार्गने याला उत्तर देईन, असे आव्हाहन सर्व हिंदू समाजाच्या वतीने करीत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या