💥राष्ट्रवादी नेते मो.युसूफ पुंजानी यांची प्रमुख उपस्थिती💥

फुलचंद भगत

वाशिम:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व उत्कृष्ट योद्धा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी नेते मो.युसूफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार १९ फेब्रुवारी स्थानिक शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ११ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली. 

            यावेळी न.प.उपाध्यक्ष जुम्मा पप्पुवाले, ऍड.फिरोज शेकूवाले, जाकिर शेख,सलीम गारवे,सलीम प्यारेवाले, अ एजाज ,आरिफ मौलाना,सै मुजाहिद, इर्शाद अली,अ रशीद,जावेदोद्दीन, समीर पठाण,जुबेर पठाण,वहिद शेख,सदीम नवाज, मुजाहिद खान,अमीर पठाण,मुन्नाभाई ठेकेदार,मोहसीन शेख,अफसर भाई आदीसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम