💥पुर्णा तालुक्यातील मौ.माखणी येथे शिवजयंती महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न...!


💥यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच नेमाजी गाडे उपस्थित होते💥

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - तालुक्यातील माखणी येथील प्राथमिक शाळेत आज शनिवार दि.१९ फेब्रुवारी रोजी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच नेमाजी गाडे उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच गोविंदराव आवरगंड, प्रगतिशील शेतकरी जनार्दन आवरगंड, रंजीत आवरगंड  चांदाजी आवरगंड, नवनाथ आवरगंड ,सदाशिव आवरगंड ,अनुरथ आवरगंड, नामदेव पदमपल्ली ,परसराम पुरी, अंगद आवरगंड, माधव आवरगंड आदींची उपस्थिती होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक जोशी सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासन कार्याचा आणि आजच्या प्रशासन कार्याचा मेळ घालून शिवराय समजावून सांगितले.यावेळी शाळेतील अनेक मुलांनी आपल्या बहारदार भाषणांतून छत्रपतींच्या जीवन कार्याचा इतिहास उलगडून दाखवला. श्री जनार्दन आवरगंड आणि चांदाजी आवरगंड यांची छत्रपती च्या जीवनावर आधारित समायोचित भाषणे झाली.श्रध्दा आवरगंड शिवम् आ, मीलींद गाडे दिव्या आवरगंड पवन कदम मयुरी आ, सानिका आ, अशा या बहारदार कार्यक्रमात विद्यार्थ्यांची भाषणे ऐकत असताना सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महाजन सर यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या